Omkar Elephant Dainik Gomantak
गोवा

Omkar Elephant: 'ओंकार' हत्तीमुळे 31 शेतकऱ्यांना फटका, 'आधारनिधी' अंतर्गत मिळणार नुकसानभरपाई; अर्ज करण्याचे आवाहन

Aadharnidhi scheme compensation Goa: फळदेसाई यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, महाराष्ट्रातून गोव्याच्या सीमाभागात पेडणे तालुक्यातील गावांमध्ये ‘ओंकार’ हत्तीने शेतीचे नुकसान केले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: ओंकार हत्तीने तांबोसे आणि उगवे येथील ३१ शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान केले आहे. राज्य सरकारच्यावतीने जंगली प्राण्यांपासून होणाऱ्या शेतीच्या नुकसानभरपाईसाठी ‘आधारनिधी’ योजना राबविली जाते, त्या योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी कृषी खात्याकडे अर्ज करावेत, त्यांना त्यांची नुकसानभरपाई मिळेल, अशी माहिती कृषी संचालक संदीप फळदेसाई यांनी दिली.

फळदेसाई यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, महाराष्ट्रातून गोव्याच्या सीमाभागात पेडणे तालुक्यातील गावांमध्ये ‘ओंकार’ हत्तीने शेतीचे नुकसान केले. या हत्तीने तांबोसे आणि उगवे येथील शेतकऱ्यांच्या नारळ, सुपारी, केळी बागायतींचे, त्याचबरोबर भातशेती, भाजीपाला शेतीचे नुकसान केले आहे. कृषी खात्याने नुकसान केलेल्या शेतीचे पंचनामे केले असून, त्यात ३१ शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला असल्याचे दिसून आले आहे.

ओंकारचा सीमाभागातील महाराष्ट्र व गोव्यातील गावांमध्ये संचार राहिला. आता तो महाराष्ट्रात परतला असला तरी कर्नाटकातील दहा हत्तींच्या कळपाने गोव्याच्या सीमेवर मुक्काम ठोकला आहे. त्यामुळे या कळपाचे गोव्यात येणे रोखण्यासाठी वन खात्याला कसरत करावी लागणार आहे. ओंकार हत्तीच्या मुक्कामामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले असून, त्यांना गोवा सरकारच्यावतीने मदत केली जाणार आहे.

कृषी कार्ड गरजेचे!

शेतकऱ्यांकडे कृषी कार्ड असणे गरजेचे आहे; परंतु काही शेतकऱ्यांकडे तेही नसल्याचे दिसून आले आहे. त्यांचे दोन दिवसांत कृषी कार्ड करून दिले आहे. कोणी अर्ज करायचे राहिले असल्यास त्यांना त्याविषयी सूचित करण्यास स्थानिक पंचांना सांगितले आहे. भातशेतीसाठी प्रतिहेक्टरसाठी ४० हजार रुपये नुकसानभरपाई दिली जाते. फळबाग असेल तर त्या झाडांच्या वयानुसार भरपाई ठरविली जाते, असेही फळदेसाई यांनी स्पष्ट केले.

नुकसानीची वर्गवारी!

ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्या शेतकऱ्यांनी ‘आधारनिधी’ योजनेअंतर्गत कृषी खात्याकडे अर्ज करावेत. त्यांच्या नुकसानीची वर्गवारी करण्यात आली असून, त्यानुसार ती रक्कम त्या शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. अजून १० शेतकऱ्यांनी अर्ज केलेले नाहीत. क्षेत्रीय कृषी अधिकाऱ्यांनी गावात जाऊन नुकसान किती झाले आहे, त्यानुसार नुकसानभरपाई ठरविली आहे, असे फळदेसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोडलेला हात आणि पाय, लंगडी घालत आला पोलिस स्थानकात; ऑस्ट्रेलियन खेळाडुंची छेड काढणाऱ्या संशयिताला अटक Watch Video

Satish Shah: सलग 55 एपिसोडमध्ये साकारल्या 55 भूमिका, सतीश शाहांचे निधन; हसऱ्या चेहऱ्याचा पडला पडदा

गोव्यात प्रथमच पार पडली वजन-माप खात्याच्या नियंत्रकांची राष्ट्रीय परिषद; CM सावंतांनी दिली ग्राहकांच्या हक्काचे जतन करण्याची हमी

हाताशी आलेली भातशेती आडवी, पणजीत घराचे नुकसान; गोव्यात मान्सूनोत्तर पावसाचे धुमशान

आमदार दिलायला लोबोंचा भिंत बांधकामावर प्रत्युत्तर; आरोपांना दिले राजकीय हेतूचे वळण

SCROLL FOR NEXT