Omkar Elephant : ‘ओंकार’ पुन्हा गोव्यात प्रवेश करणार? तेरेखोल नदीजवळ वनखाते सज्ज; पाळतीसाठी ड्रोनचा वापर
पेडणे: गोव्याच्या हद्दीतून काल सिंधुदुर्ग-महाराष्ट्राच्या हद्दीत गेलेल्या ओंकार हत्तीचा मुक्काम सातोसे भागातच असून सिंधुदुर्ग वन कर्मचारी व स्थानिक रात्रंदिवस त्याच्या पाळतीवर आहेत. वन कर्मचारी व स्थानिक रात्री व दिवसा असे दोन पाळ्यांत काम करत असून यातील गोव्याच्या हद्दीत परत पाठवण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत.
वन खात्याने बारा कर्मचारी तैनात केले आहेत. हत्ती डोंगराच्या बाजूने जाऊ नये म्हणून दिवसा ते सर्वजण डोंगराच्या बाजूने जाणाऱ्या वाटा अडवतात तर रात्रीच्या वेळी ड्रोन चा वापर करून हत्तीवर ते पाळत ठेवत आहेत.
हत्ती डोंगराऐवजी खालच्या भागातच राहील, अशी काळजी वन कर्मचारी घेत आहेत. हत्तीला पिटाळून लावण्यासाठी लावण्यात येणाऱ्या ॲटम बॉम्ब व फटाक्यांचे आवाज उगवे व कासुले भागात रात्रंदिवस ऐकायला येत आहेत.
एकंदर सिंधुदुर्ग वन खात्याचे कर्मचारी व स्थानिकां नी चालवालेली ही कृती म्हणजे गोव्याच्या हद्दीतून तेरेखोल नदीतून ज्याप्रकारे सातोसे -सिंधुदुर्ग भागात गेला होता त्याच मार्गे हत्तीला परत ते तेरेखोल नदीतून गोव्याच्या हद्दीत पिटाळून लावण्याचे प्रयत्न चालले आहेत हे स्पष्टपणे जाणवत आहे.
गेल्या आठवड्यात मोपा भागातून ओंकार हत्ती सिंधुदुर्ग भागात गेल्यानंतर सिंधुदुर्गमधील वन कर्मचारी व स्थानिकांनी या हत्तीला गोव्याच्या हद्दीपर्यंत आणून सोडले होते. महत्वाचे म्हणजे वन खात्याची जीपही हत्तीच्या मागे गोवा हद्दीपर्यंत पोहचली होती. वास्तविक सातोसेत हत्ती आहे तिथे पुढे जंगल आहे, त्यामुळे उपद्रव होण्याची शक्यता नाही.
सिंधुदुर्ग वन कार्यालयाचे दुर्लक्ष नडले
जूनमध्ये हा ओंकार हत्ती जेव्हा सिंधुदुर्गात दाखल झाला होता, तेव्हा महाराष्ट्र वन खात्याने या हत्तीला ताब्यात घेऊन यापूर्वी तो ज्या कळपात होता, त्या हत्तीच्या कळपासोबत किंवा अन्यत्र जंगलात सोडून देण्याचा आदेश दिला होता. पण सिंधुदुर्ग वन कार्यालयाने तसा प्रयत्न न केल्याने हा हत्ती गोव्याच्या हद्दीत आला होता. दरम्यान, पेडणे वन खात्याचे कर्मचारी हत्ती गोव्याच्या हद्दीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. तिथे तेरेखोल नदीजवळ या सर्व हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

