Goa Old Margao Road  Canava
गोवा

Goa Road: जुन्या मडगाव रस्त्याची अवस्था दयनीय; दुचाकीस्वारांना अपघाताला निमंत्रण

Old Margao Road: अंधारात व पावसात हे खड्डे अपघाताला निमंत्रण देत आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

मळ्यातून रुअ दि ओरे खाडीलगत असलेल्या जुना मडगाव रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे. मलनिस्सारण वाहिनीच्या मॅनहोलसाठी निर्माण केलेले खड्डे व्यवस्थित न भरल्याने तेथील जागा खचल्या आहेत. त्यामुळे निर्माण झालेले खड्डे रात्रीच्यावेळी दुचाकीस्वारांना अपघाताला निमंत्रण देत आहेत, असे दिसते.

पिपल्स हायस्कूलला लागून असलेल्या या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. पावसामुळे भरलेले खड्डे पुन्हा तयार झाले असून, तात्पुरती केलेली डागडुजी ही वरवरची असल्याचे दिसत आहे. या मार्गावरून दररोज सांताक्रूझमधून पणजीला हजोरा वाहने ये-जा करतात. त्याशवाय याच मार्गावरून अवजड आणि सांताक्रूझ बसेस ये-जा करतात.

स्मार्ट सिटींअंतर्गत या रस्त्याचे भाग्य कधी उजळायचे ते उजाळेल, पण पावसाळ्याच्या सुरुवातीला या रस्त्याची झालेली दूरवस्था पाहता तो पुढे कसा असेल याची कल्पनाही करावीवाटत नाही. या रस्त्यावरील बाजूची कधी-कधी दिवे लागत नाहीत, अंधारात व पावसात दुचाकीस्वारांना हे खड्डे अपघातालाच निमंत्रण देत आहेत.

अपघाताची शक्यता

जोरदार पडणाऱ्या पावसात खड्ड्यात पाणी भरल्यामुळे वाहनचालकांना खड्ड्याच्या खोलीचा अंदाज येत नाही. त्यामुळे वाहने घसरणे, पडण्याचे प्रकार वाढत आहेत. शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना या खड्ड्यामुळे या मार्गावरून ये-जा करणेही कठीण होत आहे. या खड्ड्यामुळे अपघात घडण्याची शक्यताही आहे. पाऊस कमी झाल्यावर त्वरित हे खड्डे बुजविणे गरजेचे आहे, असे मत येथील नागरिकांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kundaim Fire: कुंडई वीजतारांमुळे वाढला धोका! आगीच्या घटनांमध्ये वाढ; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

खोटी कागदपत्रं वापरून घेतला पासपोर्ट, गोव्यात करायची सलूनमध्ये काम; फिलिपिन्स महिलेसह स्थानिकाच्या आवळल्या मुसक्या

"वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून विकास करणार"! रितेश नाईकांनी दिली ग्वाही; पांचमे- खांडेपार तळ्याच्या संवर्धन कामाचे केले उद्‍घाटन

Farmagudhi to Bhoma Road: फर्मागुढी-भोम रस्ता काम होणार सुरु! मंत्री कामतांची ग्वाही; बांदोडा ‘अंडरपास’चे उद्‌घाटन

Chimbel Unity Mall: 'चिंबल' ग्रामस्थांचे मोठे यश! युनिटी मॉल बांधकाम परवान्याला दिले आव्हान; सरकारी पक्षाचा विरोध फेटाळला

SCROLL FOR NEXT