Dolby Dainik Gomantak
गोवा

Narkasur Celebration: नरकासुर प्रदर्शनावेळी पणजीत वाढला दणदणाट! आवाज 100 डेसिबलपेक्षा जास्त; नागरिकांच्या तक्रारी

Panaji Narkasur: व्‍यावसायिक विभागासाठी दिवसा ६६ आणि रात्री ५५ डेसिबल, निवासी विभागासाठी दिवसा ५५ आणि रात्री ४५, तर संवेदनशील भागांत दिवसा ५० आणि रात्री ४० डेसिबल अशी आवाजाची मर्यादा घालून देण्‍यात आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: दिवाळी काळात राज्‍यातील ध्‍वनी प्रदूषणात वाढ होऊ नये, यासाठी राज्‍य प्रदूषण नियंत्रण मंडळाने (पीसीबी) ध्‍वनी प्रदूषण करणाऱ्यांना एक लाख रुपयांपर्यंतचा दंड आकारण्‍याचा इशारा दिला होता.

तरीही रविवारी रात्री नरकासुर प्रदर्शन आणि दहनाच्‍या निमित्ताने राजधानी पणजी परिसरातील अनेकांनी मंडळाच्‍या इशाऱ्याकडे काणाडोळा केला आणि संगीत वाजवण्‍यासाठी कायद्याने निर्धारित केलेली आवाजाची मर्यादाही (१०० डेसिबलपेक्षा जास्त) ओलांडली.

त्‍याचा त्रास त्‍या भागांत राहणारे वृद्ध, तसेच आजारी नागरिकांना सहन करावा लागला. कायद्यानुसार व्‍यावसायिक विभागासाठी दिवसा ६६ आणि रात्री ५५ डेसिबल, निवासी विभागासाठी दिवसा ५५ आणि रात्री ४५, तर संवेदनशील भागांत दिवसा ५० आणि रात्री ४० डेसिबल अशी आवाजाची मर्यादा घालून देण्‍यात आली आहे. मंडळांकडून मोठ्या आवाजात संगीत वाजवले जाते.

त्‍यावर नियंत्रण ठेवण्‍यासाठी मंडळाने काही दिवसांपूर्वी घेतलेल्‍या बैठकीत कडक उपाययोजना करण्‍याचा निर्णय घेतला होता. व्‍यावसायिक भागात रात्री १० नंतर संगीत वाजवणाऱ्यांना एक लाखापर्यंत, तर इतर भागांमध्‍ये आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्यांना पहिल्‍या गुन्‍ह्यासाठी २० हजार, दुसऱ्या गुन्‍ह्यासाठी ४० हजार आणि त्‍यानंतर गुन्‍ह्याची पुनरावृत्ती केल्‍यास एक लाख रुपये दंड करण्‍याचा निर्णयही घेतला आहे.

पणजीत नियम धाब्यावर

दिवाळीत नरकासुर दहनाच्‍या निमित्ताने पणजीसह अनेक भागांतील नरकासुर बनवणाऱ्या मंडळांनी आवाजाची मर्यादा ओलांडली, असा शहरातील नागरिकांचा दावा आहे. पणजीतील सांतिनेज भागात ध्‍वनिप्रदूषणाचा बराच त्रास झाला, अशा तक्रारी करण्यात आल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT