Colva beach in Goa 
गोवा

Goa: कोलवा किनाऱ्यावर नो एंट्री, मात्र महाराष्ट्र-कर्नाटकातून खुलेआम एंट्री

गोव्यातील (Goa) कोलवा पोलिसांनी समुद्रकिनाऱ्यावर (Colva beach) होत असलेली लोकांची प्रचंड गर्दी टाळण्यासाठी किनाऱ्याचा प्रवेश तसेच निर्गमन मार्ग बंद

दैनिक गोमन्तक

मडगाव: गोव्यातील (Goa) कोलवा पोलिसांनी समुद्रकिनाऱ्यावर (Colva beach) होत असलेली लोकांची प्रचंड गर्दी टाळण्यासाठी रविवारी किनाऱ्याचा प्रवेश तसेच निर्गमन मार्ग बंद केल्यामुळे रविवारची सायंकाळ घालविण्यासाठी मोठ्या संख्येने आलेल्यांची घोर निराशा झाली. शनिवारी सायंकाळी तेथे मोठ्या संख्येने लोक आले होते व त्यानंतर खबरदारी म्हणून पोलिसांनी हे पाऊल उचलले. त्यासाठी काल दुपारपासूनच कोलवा तसेच बाणावली किनारी भागात मोठ्या संख्येने पोलिस तसेच वाहतूक पोलिस तैनात केले होते.

कोलवा जंक्शनवर तैनात केलेल्या पोलिसांनी लोकांच्या गाड्या तेथूनच वळविल्या. ते पाहून काहींनी त्या बाणावली किनाऱ्याकडे वळविल्या, पण तेथेही पोलिसांनी त्यांचा प्रवेश रोखला व त्यामुळे निराश होऊन लोकांना घरी परतणे भाग पडले. यामुळे कोलवा किनाऱ्यावरील वाहन तळावर काल शुकशुकाट होता.

तेरेखोलमार्गे राज्‍यात खुलेआम वाहतूक

तप दुसरीकडे कोविड महामारीशी सामना करताना सरकारने राज्‍याच्या सीमेवर कडक निर्बंध लागू केल्याने त्‍यावर चांगल्‍या प्रकारे नियंत्रण मिळवता आले. परंतु तेरेखोलमार्गे परराज्यातील वाहतूक सेवा गोव्यात प्रवेश करत असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. यामुळे पुन्‍हा कोरोनाचा उद्रेक होण्‍याची भीती व्‍यक्त केली जात आहे. गोव्याचे उत्तरेतील प्रवेशद्वार म्हणजे किरणपाणी, सातार्डा, पत्रादेवी व तेरेखोल. पहिल्‍या तीन ठिकाणी पोलिस तैनात आहेत. पण तेरेखोलमार्गे खुलेआम वाहतूक होत असल्याने चिंता व्‍यक्त करण्‍यात येत आहे.

सद्य:स्थितीत महाराष्ट्रात कोविडबाधित रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने गोमंतकीय लोक किंचित बेदखल असले तरी नव्याने दाखल होणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध असायलाच हवेत असे मत एक स्‍थानिक नागरिक मदन पेडणेकर यांनी व्यक्त केले. कोरोनाच्या काळात कित्येक जणांनी युक्त्या वापरून हित व स्वार्थ साधला आहे. त्यात खरेदी-विक्री करण्याच्या बाबतीत हुशारी दाखवली जाते. गोव्‍यात नोंदणी झालेल्‍या वाहनांतून महाराष्ट्र व कर्नाटकातील लोक गोव्यात खुलेआम येऊ शकतात, असा संशय युवक मिथिलेश हरमलकर यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT