Goa: पणजी, म्‍हापशात पर्यटकांची रीघ, कोविड नियमांचे तीन-तेरा

गोव्यात (Goa) समुद्र किनाऱ्यावर पुन्हा गर्दी होऊ लागली आहे. स्थानिकही पाय मोकळे करायला किनाऱ्यावर येऊ लागले आहेत.
Tourists roam the beaches of Goa without mask
Tourists roam the beaches of Goa without maskDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव : संचारबंदीचे नियम काही प्रमाणात शिथिल झाल्यामुळे गोव्यात (Goa) पुन्हा पर्यटक येऊ लागले आहेत. समुद्र किनाऱ्यावर पुन्हा गर्दी होऊ लागली आहे. पर्यटक (Tourist) घोळक्याने फिरत असल्याचे दिसून येत असून स्थानिकही पाय मोकळे करायला किनाऱ्यावर येऊ लागले आहेत. पणजी, म्‍हापसा शहर परिसरातही अशीच परिस्‍थिती दिसून येत होती. तसेच वाहनांची वर्दळही होती. पर्यटकांचे गट दुचाकी घेऊन सुरक्षा नियमांची (without mask) पायमल्ली करून फिरताना दिसत होते. (Tourists roam the beaches of Goa without mask)

दक्षिण गोव्यात कोलवा, बाणावली समुद्र किनाऱ्यावर शनिवारी, रविवारी पर्यटकांची पुन्हा गर्दी वाढू लागली आहे, अशी माहिती स्थानिक व्यापाऱ्यांनी दिली. हे बहुतेक देशी पर्यटक असून आपल्या स्वतःच्या वाहनाने ते येथे येत असतात आणि भाड्याची घरे घेऊन येथे थांबत असल्याची माहिती या व्यापाऱ्यांनी दिली. यातील कित्येक पर्यटक तोंडावर व्यवस्थित मास्कही धारण करीत नाहीत आणि शारीरिक अंतरही पाळत नाहीत, असे दिसून आले आहे.

Tourists roam the beaches of Goa without mask
Goa: जनसुनावणीपुरती संचारबंदी शिथिल

सोमवारी दक्षिण गोव्यातील सर्वांत प्रसिद्ध असलेल्या पाळोळे समुद्र किनाऱ्याला भेट दिली असता स्थानिक मुलांचा समुद्रकिनाऱ्यावर खेळ रंगलेला दिसला. कोविडच्या भयाने दोन महिने लोक घरात राहिले. आता ते हळूहळू बाहेर येऊ लागले आहेत आणि समुद्र किनाऱ्यावरही दिसू लागले आहेत, अशी माहिती येथील एका व्यापाऱ्याने दिली.

सक्रिय रुग्णांची संख्या प्रथमच 100 च्या खाली

दोन महिन्यांपूर्वी कोविडचे प्रमुख संसर्गस्‍थळ बनलेल्या मडगावात सक्रिय रुग्णांची संख्या प्रथमच 100 च्या खाली आली आहे. सोमवारी मडगावात सक्रिय रुग्णांचा आकडा ९७वर पोहोचला होता. मे महिन्यात हा आकडा दोन हजारांच्या आसपास होता.

Tourists roam the beaches of Goa without mask
Goa: असे वागून पुन्हा तेच दिवस दाखवणार का? वास्तवाचे भान विसरून लोकांची गर्दी

दक्षिण गोव्यात कुठ्ठाळी (109) आणि फोंडा (108) या दोन ठिकाणीच सक्रिय रुग्ण 100 वर आहेत. वास्को येथे 85, धारबांदोडा येथे 74, लोटलीत 77, केपेत 69 तर कुडचडे येथे 68सक्रिय रुग्ण आढळून आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com