Goa Fire Tragedy Dainik Gomantak
गोवा

Goa Nightclubs: 25 जणांच्या मृत्यूचे सावट, तरीही सील केलेले नाईट क्लब पुन्हा सुरू; दोन आठवड्यांत परवाने कसे मिळाले?

Nightclub Licenses Goa: सील केलेले बहुतांश नाईट क्लब्स पुन्हा एकदा जोमाने सुरू झाले असून, पार्टीचा धुरळा उडू लागला आहे

Akshata Chhatre

sealed nightclubs reopened goa: काही दिवसांपूर्वी 'बर्च' नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत २५ निष्पाप लोकांचा बळी गेला होता. या घटनेने संपूर्ण देश हादरला आणि गोवा सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव अनेक नाईट क्लब्स सील केले होते. मात्र, नवीन वर्षाच्या स्वागतापूर्वीच धक्कादायक वास्तव समोर आलेय. सरकारने सील केलेले बहुतांश नाईट क्लब्स पुन्हा एकदा जोमाने सुरू झाले असून, पार्टीचा धुरळा उडू लागला आहे.

प्रशासकीय तत्परता की नियमांची पायमल्ली?

सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे, ज्या क्लब्सना सुरक्षेच्या कारणास्तव आणि नियमांचे उल्लंघन केल्यामुळे सील करण्यात आले होते, त्यांनी अवघ्या दोन आठवड्यांच्या आत सर्व आवश्यक परवाने आणि मान्यता मिळवल्याचे सांगण्यात येत आहे.

या अफाट वेगावर आता नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी शंका उपस्थित केली आहे. ज्या प्रकरणांत २५ लोकांचा मृत्यू झाला, त्या प्रकरणाची चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच इतर क्लब्सना 'क्लीन चिट' मिळणे हे संशयास्पद असल्याचे बोलले जातेय.

१.२ लाखांचे टेबल आणि व्हायरल जाहिराती

३० आणि ३१ डिसेंबरच्या पार्ट्यांसाठी गोव्यातील या नाईट क्लब्सनी कंबर कसली आहे. सोशल मीडियावर या पार्ट्यांच्या जाहिरातींचा पूर आलाय. मिळालेल्या माहितीनुसार, ३० आणि ३१ डिसेंबरसाठी एका टेबलचे बुकिंग १.२ लाख रुपयांपर्यंत पोहोचलेय. इतके दर वाढत असूनही पर्यटकांची मोठी गर्दी या ठिकाणी दिसून येत आहे.

सुरक्षा व्यवस्थेचे काय?

ज्या क्लब्सनी पुन्हा काम सुरू केले आहे, त्यांनी खरोखरच अग्निप्रतिबंधक नियम आणि इतर सुरक्षा निकषांची पूर्तता केली आहे का, हा मोठा प्रश्न आहे. दोन आठवड्यांच्या अल्प कालावधीत मोठ्या प्रमाणावर स्ट्रक्चरल बदल करणे किंवा सुरक्षा यंत्रणा बसवणे शक्य आहे का, यावर तज्ज्ञ साशंक आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arpora Nightclub Fire: हडफडे दुर्घटनाप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे 2 बडे अधिकारी निलंबित; दोषींना सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांनी दिला इशारा

वरगाव-पिळगावच्या ऐतिहासिक चामुंडेश्वरीची 2 जानेवारी पासून जत्रा! रंगणार ‘नौकाविहार’; 5 दिवस धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

Goa Live News: हडफडे आग प्रकरण; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दोन अधिकाऱ्यांचे निलंबन

Ponda Accident: भीषण अपघातानंतर मशिनरी पेटवली, कामगारांना मारहाण! दोघांना अटक; 16 जणांविरोधात गुन्‍हा दाखल

Goa Politics: 'गोव्यातील जनतेच्या हितासाठी ठोस भूमिका घ्या'! LOP युरींचे प्रतिपादन; काँग्रेस आमदारांतर्फे राज्यपालांना निवेदन

SCROLL FOR NEXT