PM Modi compensation  Dainik Gomantak
गोवा

Goa Nightclub Fire: गोव्यातील क्लबमध्ये अग्नितांडव! PM मोदींकडून शोक व्यक्त; मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर

PM Modi compensation Goa: केंद्र सरकारने या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना आणि जखमींना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) मदत जाहीर केली आहे

Akshata Chhatre

PM Modi compensatio Goa Club: गोव्यातील हडफडे येथे 'बर्च बाय रोमियो लेन' या नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत झालेल्या जीवितहानीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. केंद्र सरकारने या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना आणि जखमींना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) मदत जाहीर केली आहे.

मृतांच्या वारसांना २ लाख, जखमींना ५० हजार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या मदतीनुसार, या दुर्घटनेत ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या जवळच्या वारसांना (Next of Kin) PMNRF मधून प्रत्येकी २ लाख रुपये इतकी सानुग्रह मदत (Ex-gratia) दिली जाईल. तसेच, या आगीत जे नागरिक जखमी झाले आहेत, त्यांना उपचारासाठी प्रत्येकी ५०,००० रुपये देण्यात येतील. केंद्र सरकारच्या या घोषणेमुळे पीडित कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण आगीत आतापर्यंत २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, मृतांमध्ये पर्यटक आणि क्लब कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आगीच्या कारणाबद्दलच्या नवीन प्राथमिक माहितीत असे स्पष्ट झाले आहे की, सिलिंडर स्फोट झाल्याने आग क्षणार्धात भडकली. आग वेगाने पसरल्यामुळे आणि धुराचे लोट तयार झाल्यामुळे, मृतांपैकी बहुतांश लोकांचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाला आहे.

सुरक्षा नियमांवर प्रश्नचिन्ह

गोव्यातील या मोठ्या दुर्घटनेनंतर नाईट क्लब आणि पर्यटनस्थळांवरील सुरक्षा नियमांचे पालन करण्यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून, दुर्लक्ष करणाऱ्यांवर आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या क्लब व्यवस्थापनावर कठोर कारवाई केली जाईल, असे स्थानिक प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पंतप्रधानांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी दुर्घटनेबद्दल चर्चा केली असून, राज्य सरकारकडून पीडितांना सर्वतोपरी मदत केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics:"सकाळी येतो सांगून तुकाराम आलाच नाही!", RGP प्रमुखांनी काँग्रेसला पुन्हा टाळले? युतीचा 'सस्पेन्स' वाढला

Goa Nightclub Fire: हडफडे नाईट क्लब दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई: चार व्यवस्थापक अटकेत, मालकाचीही चौकशी होणार

Gautam Gambhir: "ते दोघे बऱ्याच काळापासून..." मालिका जिंकल्यानंतर गौतम गंभीर 'रो-को'बाबत काय म्हणाला?

Goa Live News: 'युतीच्या चर्चेसाठी सकाळपासून वाट पाहिली, पण प्रतिसाद नाही'; आरजीपीवर काँग्रेस नेत्यांचा आरोप

Goa Nightclub Fire: "भाजप सरकार हाय हाय..." परवाना नसतानाही नाईट क्लब सुरू कसा? विरोधक आक्रमक! VIDEO

SCROLL FOR NEXT