nightclub tragedy Goa video Dainik Gomantak
गोवा

Goa Nightclub Fire: 'हा अपघात नव्हे, 25 जणांचा खून! हडफडे नाईटक्लब दुर्घटनेवरून आमदार लोबो संतापले; Watch Video

MLA Michael Lobo Reaction: तो आगीचा अपघात नसून तो 'खून' आहे, असा थेट आणि गंभीर आरोप कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी केलाय

Akshata Chhatre

Michael Lobo statement viral: हडफडे येथील 'बर्च बाय रोमियो लेन' या नाईट क्लबमधील भीषण आगीत २५ निष्पाप लोकांचा बळी गेल्याची घटना केवळ एक 'आगीचा अपघात' नसून तो 'खून' आहे, असा थेट आणि गंभीर आरोप कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी केलाय. स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर तीव्र नाराजी व्यक्त करत लोबो यांनी हाडाफेचे सरपंच रोशन रेडकर यांनाही जाब विचारला आहे. हा गंभीर प्रकार घडण्यात चूक सर्वांची आहे असे म्हणत त्यांनी या घटनेचा तापास मुळापासून केला जाईल अशी माहिती दिली.

'डिमोलेशन ऑर्डरला स्टे कसा मिळाला?'

आमदार मायकल लोबो यांनी थेट सरपंच रोशन रेडकर यांना प्रश्न विचारला की, पंचायतीने क्लब पाडण्यासाठी निष्कासन आदेश (Demolition Orders) जारी केले असतानाही, पूर्वी या क्लबला परवाने कसे देण्यात आले? आणि याच परवान्यांच्या आधारावर क्लबला निष्कासन आदेशावर 'स्थगिती' कशी मिळवता आली? लोबो यांचा आरोप आहे की, चुकीचे परवाने दिल्यामुळेच या क्लबला बेकायदेशीरपणे कार्यरत राहण्याची संधी मिळाली आणि त्यामुळेच ही मोठी दुर्घटना घडली.

'५०० लोक तपासात अडथळा आणू शकत नाहीत'

लोबो यांनी या संपूर्ण परिस्थितीवर संताप व्यक्त करताना सांगितले की, '५०० लोकांचा जमाव' पोलिसांच्या तपासात अडथळा आणू शकत नाही. आमदार म्हणून लोबो यांनी स्पष्ट केले की, सरपंच रेडकर यांच्याबद्दल त्यांचे वैयक्तिक वैर नाही आणि ते पोलिसांवर त्यांना अडचणीत आणण्यासाठी दबाव आणणार नाहीत.

'मॅजिस्ट्रेट रिपोर्टआधी पोलिसांनी कारवाई करावी'

लोबो यांनी या घटनेच्या चौकशीवरही भर दिला. ते म्हणाले, न्यायदंडाधिकारी समितीचा अहवाल येण्यापूर्वीच पोलिसांनी सक्रियपणे कारवाई केली पाहिजे. ही घटना संपूर्ण देशभरात पसरली असल्याने गोवा पोलीस नेमके काय करतात? याकडे आता नजरा लागून राहतील.

लोबो यांच्या म्हणण्यानुसार, ही घटना केवळ निष्काळजीपणामुळे घडलेली नाही, तर प्रशासकीय यंत्रणेतील मोठ्या त्रुटी आणि बेकायदेशीर कारभाराचे हे थेट परिणाम आहेत. क्लबला काम करण्याची परवानगी देणाऱ्या स्थानिक अधिकाऱ्यांवर आणि परवानग्या देणाऱ्यांवर लवकरात लवकर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: विजय सरदेसाई, अमित पाटकर यांच्यामुळे युती तुटली; आरजीच्या मनोज परब यांचा आरोप

Goa Nightclub Fire: 'आग लागली तेव्हा आम्ही नव्हतो!' लुथरा बंधूंचा लंगडा युक्तिवाद, दिल्ली कोर्टाचा दिलासा देण्यास नकार; 'गोव्याचे उत्तर' ठरणार निर्णायक

Serendipity Arts Festival Goa: कला आणि संस्कृतीचा गोव्यात महासंगम! 12 ते 21 डिसेंबरदरम्यान सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल

Goa Nightclub Fire: गोवा नाईट क्लब आग प्रकरण! दोषींवर कठोर कारवाई होणारच; मुख्यमंत्री सावंत आक्रमक

बेळगावचे विभाजन होणार? नवीन तीन जिल्हे निर्माण करण्याची मागणी; अधिवेशनात चर्चा

SCROLL FOR NEXT