हडफडे क्लब आगीतील 3 मृतदेहांवर झारखंडमध्ये अंत्यसंस्कार; सरकारी अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून मदत

Arpora club fire victim: रांची विमानतळावर पार्थिव दाखल झाल्यानंतर, त्यांच्यावर त्यांच्या मूळ गावी अखेरचे अंत्यसंस्कार करण्यात आले
Goa nightclub fire deaths
Goa nightclub fire deathsDainik Gomantak
Published on
Updated on

Arpora Club Fire Deaths: गोव्यातील हडफडे येथील 'बर्च बाय रोमियो लेन' क्लब दुर्घटनेत जीव गमावलेल्या तीन स्थलांतरित कर्मचाऱ्यांचे पार्थिव मंगळवारी (दि.०९) सकाळी झारखंडमधील रांची येथे पोहोचले. रांची विमानतळावर पार्थिव दाखल झाल्यानंतर, त्यांच्यावर त्यांच्या मूळ गावी अखेरचे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळी ९ वाजता पार्थिव दाखल

मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये मोहित मुंडो, प्रदीप महतो आणि बिनोद महतो यांचा समावेश आहे. हे तिन्ही पार्थिव आज सकाळी ९:०० वाजता रांची विमानतळावर सुरक्षितपणे पोहोचले. पार्थिव त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी माजी मंत्री बंधू तिर्की, श्रम विभाग, MAIN या संस्थांनी आणि गोवा प्रांतातील जेसुईट मिशनरींनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले.

नातेवाईकांना विशेष शासकीय मदत

या दुःखद प्रसंगी मृतांच्या अंतिम संस्कारासाठी त्यांचे नातेवाईक वेळेवर उपस्थित राहू शकले, यासाठी विशेष शासकीय प्रयत्न करण्यात आले. स्थलांतरित संपर्क कार्यकर्ता स्टीफन अझावेडो, आयएएस अधिकारी शब्बीर आणि वसंत यांच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे मृतांचे नातेवाईक बिकास मुंडा आणि निशांत कुमार साहू यांना शासकीय खर्चावर विमानाची तिकिटे (६३,०००) मिळाली. यामुळे हे नातेवाईक आज सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत रांचीला पोहोचू शकले आणि अंत्यसंस्काराला उपस्थित राहिले.

Goa nightclub fire deaths
Arpora: 'मला पोलिसांनी मंदिरातून उचलले'! हडफडेचे सरपंच कारवाईमुळे संतप्त; भाजपचा पराभव करण्यासाठी प्रयत्न करण्याचे केले सूतोवाच

गावांमध्येही मदत आणि जनजागृती

झारखंडमधील फतेहपूर आणि गोविंदपूर या गावांमध्ये, स्थलांतरित संपर्क कार्यकर्ता सुकेश कुमार आणि बेला टोपो (MAIN) यांनी कुटुंबांना मृतदेह स्वीकारताना आणि इतर व्यवस्थेसाठी ऑन-ग्राऊंड मदत पुरवली. या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर, अशा स्थलांतरित समुदायामध्ये सुरक्षिततेबद्दल आणि त्यांच्या हक्कांविषयी जागरूकता वाढवण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांनी जनजागृती कार्यक्रम आणि पत्रक वितरण देखील केले. या घटनेने अनेक स्थलांतरित कुटुंबांना एकत्र आणले असून, या कठीण काळात त्यांना सर्व स्तरांवरून भावनिक आणि आर्थिक मदत मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com