Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Nightclub Fire: गोवा नाईट क्लब आग प्रकरण! दोषींवर कठोर कारवाई होणारच; मुख्यमंत्री सावंत आक्रमक

Goa Nightclub Fire Case: हडफडेतील रोमियो लेन क्लबला लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू होण्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: हडफडे येथील 'रोमियो लेन' क्लबला लागलेल्या आगीची चौकशी जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली समिती करीत आहे. या समितीकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याचा अभ्यास करून न्यायालयीन चौकशीबाबत विचार केला जाईल. या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी हमी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी दिली.

पर्वरी येथील मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पर्यटनमंत्री रोहन खंवटे, मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदावेलू, पोलिस महासंचालक अलोक कुमार यावेळी उपस्थित होते. हडफडेतील रोमियो लेन क्लबला लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू होण्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. या घटनेत मृत पावलेल्या १७ जणांच्या कुटुंबीयांना सरकारने ८५ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य वितरित केले आहे.

पुढील काळात अशा पद्धतीच्या घटना घडू नये, यासाठी राज्य सरकारने आवश्यक ती सर्व पावले उचलली आहेत. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून या समितीने चौकशीही सुरू केली आहे.

या समितीला आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अहवालाचा अभ्यास करून या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीबाबत निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.

राज्यातील नाईट क्लब, बार आणि रेस्टॉरंटसह पर्यटनाशी संबंधित आस्थापनांमध्ये पुढील काळात आगीच्या घटना घडू नयेत, यासाठी अशा सर्व आस्थापनांची तपासणी करण्यासाठीही समिती स्थापन करण्यात आलेली आहे.

ज्या आस्थापनांनी यासाठी आवश्यक उपकरणे ठेवलेली नाहीत, किंबहुना सरकारने जारी केलेल्या नियमांचे पालन केलेले नाही, अशा आस्थापनांचे परवाने काही दिवसांसाठी निलंबित करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

राज्यात येणारे अनेक पर्यटक धोकादायक ठिकाणी जात असतात. त्यामुळे अशा ठिकाणची सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आलेले आहेत. मद्यालये तसेच बारनाही वेळेची मर्यादा पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशा पद्धतीची जी आस्थापने वेळेची मर्यादा पाळणार नाहीत, त्यांचेही परवाने रद्द करण्यात येतील, असेही त्यांनी नमूद केले

दोषी ठरणाऱ्या सर्वच अधिकाऱ्यांवर कारवाई

रोमियो लेन क्लबला लागलेल्या आगीप्रकरणी आतापर्यंत तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. दोन अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. तर, जो एक अधिकारी चौकशीसाठी उपस्थित राहत नाही, त्यालाही पोलिसांकडून अटक करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. या प्रकरणात दोषी ठरणाऱ्या सर्वच अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले

लुथरा बंधूंना लवकरच होईल अटक

रोमियो लेन क्लबचे मालक असलेल्या आणि आगीच्या घटनेनंतर थायलंडमध्ये पळून गेलेल्या सौरव आणि गौरव लुथरा या दोन्ही बंधूंना तत्काळ अटक करण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केलेली आहे.

याबाबत राज्य सरकार सातत्याने केंद्र सरकारच्या संपर्कात असून, या दोघांनाही लवकरच अटक करण्यात येईल, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. दरम्यान, या दोन्ही बंधूंनी दिल्लीतील रोहिनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: विजय सरदेसाई, अमित पाटकर यांच्यामुळे युती तुटली; आरजीच्या मनोज परब यांचा आरोप

Goa Nightclub Fire: 'आग लागली तेव्हा आम्ही नव्हतो!' लुथरा बंधूंचा लंगडा युक्तिवाद, दिल्ली कोर्टाचा दिलासा देण्यास नकार; 'गोव्याचे उत्तर' ठरणार निर्णायक

Serendipity Arts Festival Goa: कला आणि संस्कृतीचा गोव्यात महासंगम! 12 ते 21 डिसेंबरदरम्यान सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल

बेळगावचे विभाजन होणार? नवीन तीन जिल्हे निर्माण करण्याची मागणी; अधिवेशनात चर्चा

Goa Tourism: सुट्टीसाठी गोव्यात चाललाय? 'Akshaye Khanna'ने शुटींग केलेली एकमेव जागा पाहा; 24 वर्षांनंतरही पर्यटक करतात तुफान गर्दी

SCROLL FOR NEXT