बेळगावचे विभाजन होणार? नवीन तीन जिल्हे निर्माण करण्याची मागणी; अधिवेशनात चर्चा

Belagavi division news: रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळ यांनी याबबात मंगळवारी संध्याकाळी याबबात लक्षवेधी मांडली.
New district demand Karnataka
Karnataka CM Siddaramaiah | Belagavi Division DemandDainik Gomantak
Published on
Updated on

बेळगाव: कर्नाटक सरकारचे सध्या हिवाळी अधिवेशन बेळगावमध्ये सुरु आहे. या अधिवेशनात बेळगावचे विभाजन करुन तीन नवीन जिल्हे निर्माण करण्याची मागणी समोर आली आहे.

जिल्ह्याचे विभाजन करुन चिकोडी आणि गोकाक असे नवीन जिल्हे निर्माण करण्याची मागणी होत असून, महसूल मंत्र्यांनी याबाबत महत्वाचे भाष्य अधिवेशनात केले आहे.

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी बेळगावचे विभाजन करुन गोकाक आणि चिकोडी असे दोन नवीन जिल्हे स्थापन करण्याची मागणी करण्यात आली. रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळ यांनी याबबात मंगळवारी संध्याकाळी याबबात लक्षवेधी मांडली.

आमदार शशिकला जोल्ले आणि भालचंद्र जारकीहोळी यांनी देखील नवीन जिल्ह्यांची निर्मिती आवश्यक असल्याचे मत यावेळी मांडले.

New district demand Karnataka
Video: 36 वर्षांपूर्वी लाहोरमध्ये विनोद खन्नांनी केलेली 'ती' स्टेप; अक्षय खन्नाचा FA9LA डान्स वडिलांची 'Copy'?

राज्याचे महसूल मंत्री कृष्ण ब्यायरेगौडा यांनी यावर उत्तर देताना बेळगावचे विभाजन आणि नवीन जिल्ह्यांची निर्मिती संवेदनशील विषय असल्याचे मत मांडले. पण, सर्वांची मते जाणून घेत्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी चर्चा करुन याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही ब्यायरेगौडा यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, बेळगावसारख्या मोठ्या जिल्ह्याचे विभाजन करुन दोन ते तीन नवीन जिल्हे निर्माण करण्याची मागणी होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

New district demand Karnataka
Aropra Nightclub Fire: रोमिओ लेन प्रकरणात 'बेली डान्सर' अडकली! केलं कायद्याचं उल्लंघन; क्रिस्टीनाला 'काम' करण्याची परवानगी नव्हती?

बेळगावचा सीमाप्रश्न अनेक वर्षापासून भिजत पडला आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांवर कन्नड सक्तीसह इतर दडपशाहीचा सामना करावा लागतो. याबाबत वारंवार आवाज उठवला जातो.

दरम्यान, कर्नाटक सरकारने आता बेळगावचे तुकडे करुन नवीन जिल्हे स्थापन करण्याचा घाट घातल्याचे दिसत आहे. हिवाळी अधिवेशनात समोर आलेल्या या विषयामुळे सीमाभागासह महाराष्ट्रातही याबाबत चर्चांणा उधाण आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com