Arpora Birch Fire News Dainik Gomantak
गोवा

Goa Nightclub Fire: पार्टी सुरू असताना मृत्यूचा तांडव! 25 मृत्यू, 3 पर्यटकांचा समावेश; 'सिलेंडर स्फोटा'मुळे नाईट क्लबला आग?

Goa nightclub fire news: आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नसले, तरी सिलिंडर स्फोट झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

Akshata Chhatre

म्हापसा ता. ७ (प्रतिनिधी): हडफडे येथील 'बर्च बाय रोमिओ लेन क्लब' या क्लबमध्ये शनिवारी (दि.६) मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. अग्रिशमन दल आणि पोलिसांनी सर्व मृतदेह बाहेर काढून त्यांना जीएमसीमध्ये पाठविले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नसले, तरी सिलिंडर स्फोट झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मृत्यूचा नेमका आकडा काय?

गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 'क्लब बर्च बाय रोमियो लेन'मध्ये लागलेल्या या मोठ्या आगीत २५ हून अधिक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ४ पर्यटक असल्याचे निश्चित झाले आहे, तर १४ जण क्लबचे कर्मचारी होते. उर्वरित ७ जणांची ओळख अद्याप पटलेली नाही.

मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश असून, दोघांचा मृत्यू आगीत होरपळून तर उर्वरितांचा धुरामुळे गुदमरून झाल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. मृतांमध्ये क्लबचा स्टाफ तसेच काही पर्यटकांचा समावेश असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, आगीने काही क्षणांतच संपूर्ण क्लबला विळखा घातला. लाकडी संरचना, सजावट आणि ज्वलनशील साहित्य यामुळे ज्वाळांचा वेग वाढला. धुराचे दाट लोट आणि बाहेर पडण्यासाठीची धडपड यामुळे घटनास्थळी प्रचंड गोंधळ उडाला. म्हापसा, पणजी आणि कळंगुट अग्रिशमन दलाच्या गाड्यांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. स्थानिक नागरिकांनीही स्वयंसेवक म्हणून मदत केली. अनेक मृतदेह ओळखण्याजोगे नसल्याने त्यांची ओळख पटविणे अवघड ठरणार आहे

घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री, स्थानिक आमदार मायकल लोबो, पोलिस महासंचालक आलोक कुमार तसेच मोठ्या संख्येने पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, पोलिस तपास सर्व बाजूंनी सुरू असून, या दुर्घटनेमुळे गोव्यातील हॉटेल, क्लब आणि रेस्टॉरंटमधील अग्निसुरक्षा उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

अत्यंत दुर्दैवी घटना : मायकल लोबो

आमदार मायकल लोबो म्हणाले, "ही घटना अत्यंत भीषण आहे. सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले असल्यास कठोर कारवाई केली जाईल. यासंदर्भात मी जिल्हाधिकान्यांना पत्र लिहिणार असून, स्थानिक पंचायतींनी सर्व क्लबमध्ये आपत्कालीन सुरक्षेची तपासणी करावी"

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT