court Gomantak Digital Team
गोवा

Goa News : आरोपपत्रविरोधी याचिका फेटाळल्या प्रथमश्रेणी न्यायालयाच्‍या आदेशावर शिक्कामोर्तब

वाहनाचे नुकसान करून जीवे मारण्याची धमकी

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News: वाहनाचे नुकसान करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी वेर्णा पोलिसानी नोंदवलेल्या गुन्ह्यात कोणताच पुरावा नसल्याने प्रकरण बंद करण्यासाठी सादर केलेला ‘ए समरी’ अहवाल मडगाव प्रथमश्रेणी न्यायालयाने फेटाळून आरोपपत्रावरील खटला सुरू करण्याचा आदेश दिला होता.

त्याला जुआंव परेरा व जेर्वासिओ परेरा या दोघांनी आव्हान दिलेली फौजदारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने फेटाळून प्रथमश्रेणी न्यायालयाच्या आदेशावर शिक्कामोर्तब केले.सालसेत येथील जुआंव परेरा व जेर्वासिओ परेरा या दोघांनी आलेक्सिओ आर्नोल्फो याच्या अलिशान गाडीच्या दर्शनी भागावर बांबूने हल्ला करून नुकसान केले होते.

त्यानंतर त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी 4 जून 2016 रोजी वेर्णा पोलिसांनी याचिकादारांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तपासावेळी ही घटना पाहिलेला कोणीही साक्षीदार पुढे येत नसल्याने पोलिसांनी पुराव्याअभावी या प्रकरणाचा ‘ए समरी’ अहवाल प्रथमश्रेणी न्यायालयात अहवाल सादर केला होता.

13 जुलै 2018 रोजी न्यायालयाने तो मान्य केला नव्हता. पुरावा नसला तरी प्रथमदर्शनी दिलेल्या तक्रारीनुसार व पोलिसांनी दाखल केलेल्या पंचनाम्यानुसार गुन्हा घडल्याचे दिसून येते, असे निरीक्षण नोंदवून तो अहवाल फेटाळला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK Live Updates: भारत-पाक महामुकाबला पावसाच्या विळख्यात? कोलंबोहून आली सर्वांत मोठी अपडेट

"आता वेळ आलीय!" गोमंतकीयांच्या दुहेरी नागरिकत्वासाठी विजय सरदेसाईंची दिल्ली दरबारी सर्वात मोठी मागणी; काय म्हणाले?

Goa History: खिलजीने यादवांना पराभूत केले! मोठ्या घोडदळासह कोकणात येऊन गोव्याची राजधानी 'गोपकपट्टणा'चा नाश केला

Shukra Gochar: शुक्राची कृपा अन् सोन्याचे दिवस...! 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाची लाट अन् आर्थिक भरभराट; होळीपूर्वीच पालटणार नशीब

Viral Video: पाक लष्करप्रमुखाची आंतरराष्ट्रीय फजिती! असीम मुनीरला सुरक्षा रक्षकानं गेटवरच केलं 'क्लीन बोल्ड'; काय घडलं नेमकं?

SCROLL FOR NEXT