Goa Schools |  Dainik Gomantak
गोवा

Goa News: पिसुर्ले विद्यालयाचे राष्ट्रीय पातळीवर यश

पिसुर्ले-सत्तरी येथील सरकारी माध्यमिक विद्यालयाने सादर केलेला ‘घनकचऱ्याचे व्यवस्थापन व उपाय’ हा प्रकल्प देशातील पहिल्या वीस प्रकल्पांमध्ये निवडला गेला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: विप्रो फाउंडेशनतर्फे देशभरात राबवलेल्या प्रकल्पात पिसुर्ले-सत्तरी येथील सरकारी माध्यमिक विद्यालयाने सादर केलेला ‘घनकचऱ्याचे व्यवस्थापन व उपाय’ हा प्रकल्प देशातील पहिल्या वीस प्रकल्पांमध्ये निवडला गेला आहे.

त्यामुळे पिसुर्ले सरकारी माध्यमिक विद्यालयाच्या मुलांना राष्ट्रीय पातळीवर दोनवेळा सहभागी होण्याची संधी यावर्षी प्राप्त झालेली आहे.

आजकाल कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. ही समस्या दूर करण्यासाठी आपण कोणते उपाय करू शकतो, त्यासाठी हा प्रकल्प विद्यार्थ्यांना समजणे खूप गरजेचे होते. सर्वप्रथम या प्रकल्पासाठी शाळेचे शिक्षक नंदा माजिक यांनी विद्यार्थ्यांना घनकचऱ्याचे महत्त्व विशद केले.

घनकचऱ्याचे योग्य रीतीने व्यवस्थापन कसे केले जाते यासाठी विद्यार्थ्यानी डिचोलीच्या कचरा प्रकल्पाला भेट दिली. तसेच विद्यार्थ्यांसाठी घनकचऱ्याची कार्यशाळा, पिसुर्ले ग्रामपंचायतीतर्फे गावातील महिलांसाठी कार्यशाळा, तसेच घनकचऱ्याविषयी जागृती करण्यासाठी गावात ठिकठिकाणी रॅली काढण्यात आली.

गावात ठिकठिकाणी मुलांनी शिक्षकांच्या मदतीने साफसफाई केली. गावातील लोकांना कापडी पिशव्या वितरित केल्या. विद्यार्थ्यांसाठी कचऱ्यासंदर्भात चित्रकला, पोस्टर तयार करणे स्पर्धा घेतल्या. या प्रकल्पासाठी शाळेचे विद्यार्थी श्रेया सामंत, शौर्य च्यारी, दिती गावडे, कनिका देसाई व इष्टदेव मौर्या यांनी काम केले.

मुख्याध्यापक उल्हास गावकर यांचे मार्गदर्शन लाभले. राष्ट्रीय पातळीवर दोनवेळा संधी मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

या प्रकल्पाचा पारितोषिक वितरण सोहळा शनिवारी (ता. 11) बंगळूर येथे होणार आहे. या पारितोषिक वितरणासाठी प्रकल्प मार्गदर्शक नंदा माजिक व प्रकल्पासाठी काम केलेले विद्यार्थी जाणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lashkar e Taiba Commander Encounter: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मूसा एन्काउंटरमध्ये ढेर! 527 दिवसांचा थरार संपला; भारतीय सैन्याची मोठी कारवाई VIDEO

Viral Video: ट्रेन थांबली नसती तर... सेकंदाचा खेळ अन् घडला भयंकर प्रकार; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ तूफान व्हायरल

India vs Pakistan: एक-दोन नव्हे तर तब्बल 3 वेळा होऊ शकते भारत-पाकिस्तानची टक्कर! वर्ल्ड कप 2027 चं संपूर्ण गणित जाणून घ्या

Canacona Water Crisis: काणकोणमधील बंधारे अद्याप खुलेच; नद्या-नाले कोरडे, पाणीटंचाईचे संकट गडद

Municipal Election: पालिका प्रभागरचनेची घाई; सरकार-निवडणूक आयोग आमनेसामने, '24 तासांत काम कसे करणार?'

SCROLL FOR NEXT