Goa News: गोवा सरकारने खाण व्यवसायाला हिरवा कंदील दाखविल्यानंतर गुरुवारी वेदांता लिमिटेडने कर्नाटकातून रेल्वे (व्हॅगन) मार्गे खनिज मुरगाव पत्तन प्राधिकरणात आणले. 12 वर्षांनी मुरगाव बंदरातून खनिज निर्यात करणार असल्याने एकप्रकारे आनंदाचा क्षण असल्याची माहिती मुरगाव पत्तन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष गुरुप्रसाद रॉय यांनी दिली.
मुरगाव बंदरात कर्नाटकातून रेल्वेमार्गे वेदांताला 4 हजार टनांपेक्षा जास्त खनिज आयात करण्यात येणार आहे. लोहमार्गाने खनिज बंदरात आणले जाईल. कर्नाटकातील खनिजाची निर्यात मुरगाव बंदरातून लवकरच केली जाणार आहे, अशी माहिती मुरगाव पोर्ट ट्रस्टचे उपाध्यक्ष गुरुप्रसाद रॉय यांनी दिली.
गोव्यात खाण व्यवसाय 2011 पासून न्यायालयाच्या आदेशामुळे बंद होता; पण राज्य सरकारने गेल्या महिन्यात राज्यातील खाणीचा लिलाव करून पुन्हा एकदा राज्यात खाण व्यवसायाला प्रारंभ केला आहे.
रॉय म्हणाले, बंदरात बॉक्साईट आणि युरियाच्या रूपात नवीन मालवाहतूक झाली आहे आणि आम्ही भरपूर नवीन माल आणू शकतो, परंतु आम्हाला स्टोरेज क्षेत्रावरील निर्बंधांचा सामना करावा लागतो.
आम्हाला सिंगल लेन रेल्वे आणि अयोग्य महामार्ग यासारख्या अडचणींचा सामना करावा लागतो. जर जलमार्गांचे चॅनेलाइज्ड केले गेले तर आम्ही बंदरात हाताळल्या जाणाऱ्या मालाच्या कमाल मर्यादेपर्यंत जाऊ शकतो.
राज्य सरकारने खाणीचा लिलाव करून राज्यातील जनतेचे स्वप्न पूर्ण केले असल्याची माहिती वेदांताचे संचालक नितेश सामंत यांनी दिली. कर्नाटक राज्याबरोबर गोव्यातील खनिज मुरगाव बंदरातून बार्ज तसेच जहाजातून पाठविण्यात येणार आहे.
पूजा करून निर्यातीला सुरुवात
गुरुवारी मुरगाव पत्तन प्राधिकरणाच्या बंदरात वेदांता लिमिटेडचा खनिज माल कर्नाटकातून दाखल झाला. याप्रसंगी एमपीएचे उपाध्यक्ष गुरुप्रसाद रॉय यांच्या हस्ते पारंपरिकरित्या पूजा करून खाण निर्यातीला सुरुवात करण्यात आली.
यावेळी वेदांता लिमिटेडचे संचालक नितेश सामंत, जहाज प्रमुख सचिंद्र अग्नी, राजन धुरी, एमपीएचे वाहतूक व्यवस्थापक जेरॉम क्लेमेंत, सहाय्यक वाहतूक व्यवस्थापक दीनानाथ मिरवडेकर व वेदांताचा इतर अधिकारीवर्ग उपस्थित होता.
मुरगाव बंदरात खाण व्यवसायाला सुरुवात होताना पाहून बंदरातील व्यवसायाला आणखी तेजी येणार आहे. साधारणपणे लोहखनिज गोव्यात हाताळले जायचे; परंतु नवीन ट्रेंड असा आहे की कर्नाटकातून खनिज बंदरात येत आहे आणि यामुळे बंदरासाठी खूप चांगला महसूल मिळतो.
बंदरासाठी हा एक चांगला मार्ग आहे आणि एमपीएवर सुमारे दोन दशलक्ष रहदारी वाढवते जे एक चांगले लक्षण आहे. 2024 पर्यंत आम्ही आमच्या मूळ स्थितीत परत येऊ अशी आशा आहे. - गुरुप्रसाद रॉय, उपाध्यक्ष, मुरगाव पत्तन प्राधिकरण
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.