New Year in Goa Dainik Gomantak
गोवा

New Year in Goa: नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची गर्दी; विदेशी पर्यटकांची संख्या मात्र घटली

New Year in Goa: कळंगुट, बागा, वागातोर, हणजूण, दोना पावला 'फुल्ल'

Ganeshprasad Gogate

New Year in Goa: न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी देशी- विदेशी पर्यटकांची गोव्यातमोठी गर्दी झाली असून समुद्र किनारे, शॅक, पंचतारांकित हॉटेल्ससह छोटे-मोठे रेस्टोरंट फुल्ल झाले आहेत.

पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे वाहनांची संख्यादेखील वाढली असून पणजी, पर्वरी भागात शुक्रवारी सकाळपासूनच वाहतूक कोंडी अनुभवायला मिळाली. विकेंड आणि 31 डिसेंबर असे समीकरण जुळून आल्याने गोव्यात एन्जॉय करण्यासाठी येणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.

नवीन वर्ष दणक्यात साजरे करण्यासाठी अनेक पर्यटक मोठ्या संख्येने गोव्याकडे धाव घेत असतात. यंदाही देशभरातून अनेक पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत.

त्यामुळेच वर्षाअखेरीस गोव्यातील सर्वच समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांनी गर्दी केली आहे, तसेच अनेक पर्यटक सहकुटूंब गोव्यात दाखल झाल्याचेही पहायला मिळत आहे. कळंगुट, बागा, वागातोर, हणजूण, दोना पाऊला सारखे टुरिस्ट पॉईंट येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

विदेशी पर्यटकांची गोव्याकडे पाठ: -

मात्र एका रिपोर्टनुसार यंदाच्या हंगामात परदेशी पर्यटकांची संख्या 65 ते 75 टक्क्यांनी घटली आहे. नववर्ष साजरे करण्यासाठी देशभरातून पर्यटक राज्यात दाखल झाले आहेत मात्र, ऑक्टोबरपासून विदेशी पर्यटकांची संख्या मात्र कमी झाली आहे.

थायलंड, श्रीलंका सारखे पर्यटनदृष्ट्या समृद्ध असणारे इतर देश पर्यटकांना मोफत व्हिसा देत आहेत. त्यामुळे पर्यटक गोव्यापेक्षा इतर ठिकाणांना पसंती देत असल्याचे आढळून आलंय. परंतु पर्यटकांच्या न येण्याची कारणं शोधणं गरजेचं असल्याचे बोललं जातंय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

Durand Cup Football: आशियातील सर्वात जुनी 135 वी 'ड्युरँड कप स्पर्धा' 25 जुलैपासून; पण सलग दुसऱ्या वर्षीही गोव्याचा एकही संघ मैदानात नाही

SCROLL FOR NEXT