Sunburn Goa 2023: 'हा तर सनातन धर्माचा अपमान!' सनबर्नमध्ये महादेवाचा फोटो वापरल्यामुळे आपचे अमित पालेकर आक्रमक

बुडत्याचा पाय खोलात: कार्यक्रमावर पोलीस कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Sunburn Goa 2023 | Amit Palekar
Sunburn Goa 2023 | Amit PalekarDainik Gomantak

Sunburn Goa 2023: जगभर प्रसिद्ध असलेला EDM म्युझिक फेस्टिव्हल म्हणजे सनबर्न फेस्टिव्हल सुरू होण्याच्या आधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्यातच आपचे अमित पालेकर यांनी सनबर्नमध्ये भगवान महादेवांचा फोटो वापरल्याबद्दल कार्यक्रमावर पोलीस तक्रार करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Sunburn Goa 2023 | Amit Palekar
Goa Tourism 2023: किनारे गजबजले; समुद्रस्नानासाठी देशी पर्यटकांची मोठी गर्दी

एक्सवर (ट्विटर) अमित पालेकरांनी एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये स्क्रीनवर महादेवाचा फोटो असल्याचे दिसते. याबाबत आक्षेप घेत पालेकर म्हणाले की, सनबर्नच्या कार्यक्रमात महादेवाचा फोटो लावला असून समोर लोक मद्य पित नाचत आहेत. हे कृत्य म्हणजे आमच्या देवाचा आणि सनातन धर्माचा अपमान आहे.

ते पुढे म्हणाले म्हणाले की, सनबर्न महोत्सव हा मद्य प्रमोशन करण्यासाठी असतो. अशा ठिकाणी आमच्या देवाचा फोटो वापरुन आयोजकांनी धर्माचा अवमान केला आहे. याबाबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कार्यक्रमावर लवकरात लवकर गुन्हा नोंद करावा. तसेच पोलीस महासंचालक जसपाल सिंह यांनी या गुन्ह्याची दखल घ्यावी.

अमित पालेकरांच्या या मागणीनंतर आधीच अनेक मुद्यांनी अडचणीत असलेल्या सनबर्न फेस्टिव्हल आयोजकांची 'बुडत्याचा पाय खोलात' अशी परिस्थिती झाली आहे.

सनबर्नचे 82.50 लाख किंमतीचे 600 पास चोरी तर दुसरीकडे दोन मुली रुग्णालयात दाखल

दरम्यान, सनबर्नच्या 82.50 लाख किंमतीच्या तब्बल 600 पासची चोरी झाल्याचे उघकीस आले असून, आयोजक टीममधूनच ही चोरी झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी पाच कर्मचाऱ्यांना अटक केलीय.

तर दुसरीकडे, सनबर्नमधून दोन मुलींना रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुलींना नेमकं कोणत्या कारणासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले याबाबत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com