Goa Education Dainik Gomantak
गोवा

Goa Education: नव्या शैक्षणिक वर्षापासून दहावीचा अभ्‍यासक्रम बदलणार, पहिली ते दहावी या सर्वच इयत्तांसाठी 'NEP'ची अंमलबजावणी

Goa NEP Implementation 2026-27: नव्‍या शैक्षणिक धोरणांतर्गत (एनईपी) आगामी २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात नववी आणि दहावीचा अभ्‍यासक्रम बदलणार.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी : नव्‍या शैक्षणिक धोरणांतर्गत (एनईपी) आगामी २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात नववी आणि दहावीचा अभ्‍यासक्रम बदलणार असून, पहिली ते दहावी या सर्वच इयत्तांसाठी ‘एनईपी’ची अंमलबजावणी होणार असल्‍याची माहिती राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्‍या (एससीईआरटी) संचालक मेघना शेटगावकर यांनी रविवारी ‘गोमन्‍तक’ला दिली.

केंद्र सरकारने गोव्‍यासह सर्वच राज्‍यांना ‘एनईपी’ची अंमलबजावणी करण्‍याचे निर्देश काही वर्षांपूर्वी दिले होते. त्‍यानुसार गोवा सरकारने तत्‍काळ टप्‍प्‍या-टप्‍प्‍याने ‘एनईपी’ची अंमलबजावणी करण्‍यास सुरुवात केली. सुरुवातीच्‍या काळात फाऊंडेशन पातळीवर अंमलबजावणी केल्‍यानंतर तिसरी, सहावी, नववी आणि दहावी या इयत्तांसाठी ‘एनईपी’ लागू करण्‍यात आली.

शिवाय त्‍यानुसार अभ्‍यासक्रमातही आवश्‍‍यक ते बदल करण्‍यात आले. आगामी २०२६-२७ च्‍या शैक्षणिक वर्षात उर्वरित पहिली, दुसरी, चौथी, पाचवी, सातवी आणि आठवीसाठीही ‘एनईपी’ लागू करण्‍याचा निर्णय ‘एससीईआरटी’ने घेतला आहे. तिसरी आणि सहावीसाठी यंदाच नवा अभ्‍यासक्रम दिला असल्‍याने पुढील शैक्षणिक वर्षात तो कायम राहील. परंतु, नववी आणि दहावीसाठीचा अभ्‍यासक्रम मात्र बदलण्‍यात येणार असल्‍याचे शेटगावकर यांनी सांगितले.

दरम्‍यान, ‘एनईपी’ची सर्वप्रथम अंमलबजावणी करणारे गोवा हे देशातील पहिले राज्‍य असून, त्‍यासाठी आवश्‍‍यक ते बदल आणि साधनसुविधा उभारण्‍याचे काम शिक्षण खात्‍याने सुरू केले आहे.

आजपासून परिचय कार्यक्रम

‘एनईपी’ लागू करत असताना योग्‍य अंमलबजावणीसाठी ‘एससीईआरटी’ने शिक्षकांना गोव्‍यात तसेच बंगळुरू येथे पाठवून त्‍यांना त्‍याबाबतचे प्रशिक्षणही दिले होते. त्‍यानंतर आता या धोरणाचा परिचय करून देण्‍यासाठी सोमवारपासून कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात येणार असून, त्‍याची सुरुवात केपे येथून होणार असल्‍याचेही मेघना शेटगावकर यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: विधानसभा तिकीटासाठी 4 कोटींची बोली? खर्गेंच्या हॉटेल बिलावरूनही ग्रासियस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

AC Compressor Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू; पालकांचा काळीज पिळवटणारा आक्रोश VIDEO

खरी कुजबुज: धो धो आश्वासने!

Goa Crime: 'त्या' नराधम बापाला कोर्टाचा मोठा दणका! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी ठोठावली 20 वर्षांची शिक्षा; 1.30 लाखांचा दंड

Telangana Accident: किंकाळ्या अन् आक्रोश! अनियंत्रित बसची कंटेनरला जोरदार धडक, 6 ठार, 20 जखमी; तेलंगणात भीषण अपघात

SCROLL FOR NEXT