Goa New DGP Alok Kumar And Former DGP Jaspal Singh Dainik Gomantak
गोवा

Goa New DGP: नव्या पोलिस महासंचालकांनी घेतला पदाचा ताबा; कायदा, सुव्यवस्था राखण्याचे आव्हान

Goa DGP: आसगाव येथील घर मोडतोड प्रकरणात महासंचालक जसपाल सिंग यांचा कथित सहभाग असल्याचा आरोप झाला.

गोमन्तक डिजिटल टीम

वादग्रस्त जसपाल सिंग यांची दिल्लीत बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी आलोककुमार यांची गोव्याचे नवे पोलिस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आलोककुमार रविवारी गोव्यात दाखल झाले. आज (सोमवार, दि.१५ जुलै) त्यांनी महासंचालक पदाचा ताबा घेतला आहे.

नव्या पोलिस महासंचालकांसमोर राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

रविवारी (दि.१४ जुलै) दुपारी आलोककुमार गोव्यात दाखल झाले. दाबोळी विमानतळावर मुख्य सचिव पुनित गोयल, दक्षिण गोवा जिल्हा पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मुरगावचे पोलिस उपअधीक्षक सलीम शेख, वास्को पोलिस स्थानकाचे निरीक्षक कपिल नायक उपस्थित होते.

आसगाव येथील घर मोडतोड प्रकरणात महासंचालक जसपाल सिंग यांचा कथित सहभाग असल्याचा आरोप झाला. या प्रकरणात सिंग यांनी संशयितांना पाठीशी घातल्याचा ठपका ठेवल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. तसेच राज्य सरकारकडून त्यांना मिळालेल्या अभयावरूनही विरोधकांसह सर्व स्तरांतून टीकेची झोड उठली होती.

जसपाल सिंग यांना हटविण्यापूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलेला दिल्ली दौराही अनेकांच्या चर्चेत राहिला. अखेर सिंग यांना हटविण्याचा निर्णय झाला. आलोककुमार यांना त्यांच्या जागी नियुक्त करण्याचा निर्णय केंद्रीय गृह खात्याने घेतला आहे.

पोलिसांचा धाक नाहीच : विरोधकांचा आरोप

राज्यात सध्या कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर आहे. चोऱ्यांचे वाढते प्रमाण, जमिनीशी संबंधित घोटाळे, अपघात, गुन्हेगारी, अमली पदार्थांचे खुलेआम व्यवहार, तसे इतर काही प्रकरणांमधून होणारे कायद्याचे उल्लंघन पाहता राज्यात पोलिसांचा धाकच उरला नसल्याचा विरोधकांचा आरोप आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT