Goa News | Nagoa Panchayat Dainik Gomantak
गोवा

Goa News: नागोवा पंचायतीद्वारे परप्रांतीयांच्या माहितीचे 'ॲपद्वारे' संकलन!

Goa News: गोव्यात या प्रकारचे माहिती संकलन पहिल्यांदाच होणार आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: वेर्णा औद्योगिक वसाहतीला लागून असलेल्या नागोवा पंचायतीने परप्रांतीयांची (Foreigners) माहिती संकलित करण्याचे ठरविले आहे. या पंचायत क्षेत्रात दरवर्षी बाहेरून किती लोक येतात, ते कुठे राहतात, कोणते काम करतात, या सर्वांची डिजिटल पद्धतीने नोंद करण्याच्या ॲपचा त्यासाठी वापर करण्यात येणार आहे.

गोव्यात या प्रकारचे माहिती संकलन पहिल्यांदाच होणार आहे. सरपंच गाब्रीयल फर्नांडिस म्हणाले, पंचायत क्षेत्रात राहणाऱ्या प्रत्येक परप्रांतीय व्यक्तीला पंचायतीकडून ओळखपत्र दिले जाणार असून ते जिथे भाड्याच्या खोलीत राहतात त्या घरमालकाकडून त्यांची सर्व माहिती घेतली जाणार आहे.

नागोवा या गावातील एकूण लोकसंख्या 10 हजारांच्या आसपास असून त्यापैकी सुमारे 6 हजार लोक परप्रांतीय असून या पंचायतीला जोडून दोन औद्योगिक वसाहती असल्याने त्यात काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांनी या पंचायतीत आश्रय घेतला आहे. या पंचायतीच्या पंच सदस्यांच्या म्हणण्याप्रमाणे या परप्रांतीय कामगारांमुळे गावात कचऱ्याची समस्या वाढली असून प्रामुख्याने या समस्येवर तोडगा काढण्यासाठीच ही माहिती संकलन कल्पना पुढे आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT