Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa News : कार्यकर्त्यांमुळेच माझा मोठा विजय : श्रीपाद नाईक

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News :

पर्वरी, लोकसभा निवडणुकीत देशात व राज्यात भाजपची लाट होती. अशा वेळी कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह संचारला होता, त्यातून त्यांची मेहनत फळास आली.

उमेदवाराचा विजय हा कार्यकर्त्यांच्या श्रमाचे फळ असते व ते या निवडणुकीने पुन्हा एकदा सिद्ध केले. माझ्‍या विजयातही भाजप कार्यकर्त्यांचे योगदान सर्वाधिक आहे, असे भावोद्‌गार उत्तर गोवा खासदार व केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी येथे काढले.

पर्वरी मतदारसंघ भाजप मंडळातर्फे आयोजित कार्यकर्ता संमेलनात सत्कार स्वीकारल्यानंतर मार्गदर्शन करताना नाईक बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्यसभा खासदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, पर्यटन व माहिती तंत्रज्ञानमंत्री रोहन खंवटे, सुकूरच्या सरपंच सोनिया पेडणेकर, पेन्ह-द-फ्रान्‍सचे सरपंच स्‍वप्‍निल चोडणकर, जिल्हा पंचायत सदस्य कविता गुपेश नाईक, पर्वरी मंडळ प्रभारी रुपेश कामत व पंचसदस्य उपस्थित होते.

रोहन खंवटे म्‍हणाले की, कार्यकर्त्यांनी मनावर घेतले की, ‘जिंकू किंवा मरू’ अशा भावनेने त्यांचे काम असते. भाऊंच्या विजयासाठी अहोरात्र झटलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. केंद्र व राज्यातील ‘डबल इंजिन’ सरकारच्या माध्यमातून गोव्‍यात विकासाची गंगा आणण्यासाठी आमचा प्रयत्न असेल.

फुलांची परडी देऊन मान्‍यवरांचे स्‍वागत

लोकसभा निवडणुकीतील घवघवीत यशाबद्दल खासदार श्रीपाद नाईक व सदानंद शेट तानावडे यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. फुलांची परडी देऊन त्‍यांचे स्वागत करण्यात आले. सरपंच सोनिया पेडणेकर, सरपंच स्‍वप्‍निल चोडणकर, जिल्हा पंचायत सदस्य कविता नाईक यांनी यांनीही उभयतांचे अभिनंदन केले. सूत्रसंचालन गोकुळदास गावडे यांनी केले तर पंचसदस्य रिना फर्नांडिस यांनी आभार मानले.

बार्देश तालुक्यातील सात मतदारसंघांमधून श्रीपाद नाईक यांना सर्वांत मोठी आघाडी पर्वरी मतदारसंघातून मिळाली. बार्देश तालुक्यातून त्यांना जे २२ हजारांचे मताधिक्‍य मिळाले, त्यातील सुमारे ५ हजार ८०० मते पर्वरीतून होती.

- रोहन खंवटे, पर्यटनमंत्री

श्रीपाद नाईक यांच्‍या ऐतिहासिक विजयाने विरोधकांची बोलतीच बंद झाली आहे. कार्यकर्त्यांच्‍या श्रमाचा हा विजय आहे. ‘सबका साथ, सबका विकास और सबका प्रयास’ हा मंत्र जोपासून गोव्याच्या सर्वांगीण विकास साधणार.

- सदानंद शेट तानावडे, भाजप प्रदेशाध्‍यक्ष

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadanand Shet Tanavade: संसदेच्या वाणिज्य स्थायी समिती सदस्यपदी सदानंद शेट तानावडे यांची निवड

Bashudev Bhandari Missing Case: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी; केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेताच तपासाला वेग

Badlapur Encounter: अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राजकीय दावे विरुद्ध जनतेचा पाठिंबा; ''देवानेच न्याय केला...''

MP Viriato Fernandes: गोवा आणि गोमंतकीयांसाठी अभिमानाचा क्षण! देशाच्या संरक्षण समितीवर कॅ.विरियातो फर्नांडिसांची नियुक्ती

Goa Politics: 'मुख्यमंत्री महोदय 2 लाख नोकऱ्यांबाबत तपशीलवार माहिती द्या...'; कॉंग्रेसचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT