Goa Music Festival | Rakesh Chaurasia | Ramkumar Mishra Dainik Gomantak
गोवा

Goa Music Festival: 'स्वस्तिक'तर्फे आयोजित स्वरमंगेश महोत्सवात रंगल्या बहारदार मैफली

Goa Music Festival: स्वरमंगेश संगीत महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी विख्यात गायक उस्ताद रशिद खानयांची मैफल ऐकण्यासाठी रसिकांनी गर्दी केली होती.

दैनिक गोमन्तक

Goa Music Festival: स्वस्तिक आयोजित व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लिबर्टी आर्ट, पुणे प्रस्तुत 11 व्या स्वरमंगेश संगीत महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी रविवारी विख्यात गायक उस्ताद रशिद खान, ज्येष्ठ गायिका अश्विनी भिडे देशपांडे, ख्यातनाम तबलावाज पं. आनिंदो चटर्जी यांच्या मैफलींनी रसिकांना मनमुराद आनंद दिला.

सकाळच्या सत्राचा प्रारंभ कोलकाता येथील युवा प्रतिभाशाली गायिका संगबोर्ती दास यांच्या गायनाने झाली. तिने प्रथम तोडी राग विस्ताराने आळविला. त्यांना सुभाष फातर्पेकर (संवादिनी) व दयानिधेश कोसंबे (तबला) यांनी पूरक साथ दिली. अर्षद अली खान यांनी त्यानंतर बहारदार गायनाने रंग भरला. त्यांना अजय जोगळेकर यांनी संवादिनीवर आणि उ. अक्रम खान यांनी तबल्यावर उत्कृष्ट साथ दिली.

सकाळच्या सत्राचा समारोप पं. आनिंदो चटर्जी (तबला) व पं. प्रताप पाटील (पखवाज) यांच्या रंगतदार जुगलबंदीने झाला. सुरुवातीला पं. आनिंदो यांनी झपतालमध्ये एकलवादन करून रसिकांना भरभरून आनंद दिला.

संध्याकाळच्या सत्राचा प्रारंभ अनुपमा भागवत यांच्या सुरेख सतारवादनाने झाली. त्यांना उ. अक्रम खान यांनी रंगभरी तबला साथ दिली. त्यानंतर अश्विनी भिडे यांची मनभावन मैफल झाली. बागेश्री रागातील साडे नऊ मात्रातील एक व द्रुत तिनताल मधील अशा दोन बंदिशीही त्यांनी ऐकवल्या. त्यांना त्यांची शिष्या कौशल हाजी हिने उत्तम गायन साथ केली. मयंक बेडेकर (तबला) व राया कोरगावकर (संवादिनी) यांची साथही पूरक होती.

उस्ताद रशिद खान यांनी समारोपाच्या मैफलीत आपल्या भारदस्त गायनाने रसिकांना भरभरून आनंद दिला. जोग राग त्यांनी चैनीदारीत आळवला. त्यांच्या गायनाचा पूर्ण आनंद रसिकांनी लुटला. शिष्य अरमान खान, नागेश आडगावकर यांनी चांगली गायन साथ केली.

बासरीवादनाने रसिक मंत्रमुग्ध

महोत्सवात दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रीय गायक डॉ. शशांक मक्तेदार, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बासरीवादक राकेश चौरासिया व राष्ट्रीय कीर्तीचे कथ्यक नृत्य कलाकार राजेंद्र गंगानी यांनी रंग भरला. तबला, कथक, बासरीवादनांने रसिक मंत्रमग्ध झाले.

डॉ. शशांक मक्तेदार यांनी पूर्वा राग आळवून मैफलीला प्रारंभ केला. निकोप स्वरलगाव, भरदार आलापी, लयीत गुंफलेली बोलबाट, लोचदार ताना व घरंदाज गानविष्कार यामुळे त्यांच्या गायनातून रसिकांना स्वरानंद लाभला. त्यांनी मारवा रागही समरसून पेश केला. त्यांना डॉ. सुधांशु कुलकर्णी यांनी संवादिनीची तर डॉ. उदय कुलकर्णी यांनी पोषक अशी साथसंगत केली.

त्यानंतर राकेश चौरासिया यांच्या बासरीवादनाने कमालीची रंगत आणली. त्यांनी यमन, बागेश्री,कलारंजनी असे राग पेश केले .गायकी अंग आणि तंत्रकारी यांचा सुरेख संगम त्यात होता. वादनातील मधुरता, आलाप तानेतील नजाकत, लयकारी आणि विलक्षण गतिमानता आणि एकूणच रसिकांवर स्वरांची मोहिनी घालणारे वादन यामुळे रसिक मंत्रमुग्ध झाले. पं. राम कुमार मिश्रा यांची लाभलेली लज्जतदार तबला साथ त्यामुळे ही मैफल रसिकांना पर्वणी ठरली.

गोव्यात लिबर्टी स्कूल येणार

समारोपाच्या सत्रात, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लिबर्टी आर्टच्या डॉ. प्रीती जोशी यांनी मनोगतात, संस्थेची बत्तीस स्कुल असून गोव्यात लवकरच लिबर्टी आर्ट स्कूल सुरू करून हॉलिस्टिक एज्युकेशन दिले जाईल, अशी घोषणा केली.

स्वस्तिकच्या सचिव योगिता याजी यांच्या हस्ते स्वरमंगेश स्मणिकेचे संपादक नितीन कोरगावकर यांचा सन्मान करण्यात आला. रशिद खान यांची मैफल ऐकण्यासाठी रसिकांनी गर्दी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

BITS Pilani: 'बिट्स पिलानीतील मृत्यूंची चौकशी करा, न्यायालयीन आयोग नेमावा', प्रतीक्षा खलप यांची मागणी

Asia Cup 2025: अर्शदीप सिंह रचणार इतिहास! आशिया कपमध्ये ठोकणार 'शतक'; अशी कामगिरी करणारा ठरणार पहिलाच भारतीय

SCROLL FOR NEXT