Illegal Tenant Verification File Photo
गोवा

Illegal Tenant Verification: राज्यातील हत्या सत्रानंतर भाडेकरू पडताळणीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

पोलिसांनी खरंच योग्यरित्या भाडेकरू पडताळणीचे काम केले आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे

Kavya Powar

Illegal Tenant Verification : गेल्या दिवसात राज्यात एकूण 6 खून झाल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे भाडेकरू पडताळणीचा वादग्रस्त मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

या घटनांमुळे गोवा पोलिसांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलिसांनी खरंच योग्यरित्या भाडेकरू पडताळणीचे काम केले आहे का? भाडेकरू पडताळणीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी घरमालकांवर आणि भाडेकरूंवर कारवाई केली आहे? असे सवाल सध्या उपस्थित केले जात आहेत.

भाडेकरू पडताळणीची मोहीम बदलत्या काळाशी ताळमेळ राखण्यात अयशस्वी ठरली आहे. त्यामुळे राज्यात अधिक स्थलांतरितांचा ओघ वाढल्याने हे आणि इतर अनेक प्रश्‍न पोलिसांच्या समोर येऊ शकतात.

उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष देसाई यांना भाडेकरू पडताळणीच्या कामाबद्दल प्रश्न विचारला असता, त्यांनी भाडेकरूंची पडताळणी सुरू असल्याचे सांगितले.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ गोवा पोलीसच नाही तर दहशतवादविरोधी पथकही (ATS) राज्यभरातील भाडेकरू पडताळणीच्या मोहिमेत गुंतलेले आहे.

राज्यातील वाढत्या गुन्ह्यांमुळे या मोहिमेबाबत पोलीस अधिकच सतर्क झाले आहेत; कारण या घटनांमध्ये परप्रांतीयांचा प्रामुख्याने सहभाग असल्याचे समोर आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

SCROLL FOR NEXT