Dengue Patients in Goa: कळंगुटमध्ये महिलेचा डेंग्यूमुळे मृत्यू; मायकल लोबोंनी पंचायतींना केल्या 'या' सूचना

राज्यात सध्या डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत
Dengue Patients in Goa
Dengue Patients in GoaDainik Gomantak

Dengue Patients in Goa: राज्यात सध्या डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत. यातच कळंगुटमध्ये एका महिलेचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला. कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी नुकतेच गोवा मेडिकल कॉलेज (GMC) येथे एका स्थानिक महिलेचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्यानंतर कळंगुट-कांदोळी किनारी भागात विशेष देखरेख करणाऱ्या ग्रामपंचायती आणि कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) यांना अधिक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.

Dengue Patients in Goa
Porvorim Fatal Accident: राज्याला अपघातांचे ग्रहण! पर्वरीत भरधाव कारने घेतला तिघांचा बळी; दोघांची प्रकृती गंभीर

याबाबत ते म्हणाले की, कांदोळी, कळंगुट आणि नेरूळमध्येही डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. मला असे वाटते की, ग्रामपंचायतींनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात सहभागी व्हावे कारण PHC कडे सर्व भाग कव्हर करण्यासाठी तेवढे कर्मचारी नाहीत.

त्याचसोबत लोकांनी त्यांच्या सभोवतालचे साचलेले पाणी तपासले पाहिजे आणि कोणतेही कंटेनर, तुटलेल्या बादल्या, टायर, नारळ रिकामे केले पाहिजेत. जलतरण तलाव हे डासांच्या उत्पत्तीचे प्रमुख ठिकाण बनले आहेत असा दावाही त्यांनी यावेळी केला.

ते पुढे म्हणाले की, पावसाळ्यात बरेच रिसॉर्ट्स बंद असतात आणि त्यांचे जलतरण तलाव हे डासांची पैदास होण्याचे महत्वाचे ठिकाण आहे; कारण रिसॉर्ट्सवाले पाण्यात कोणतेही औषध टाकत नाहीत. त्यांनी त्यांच्या रिसॉर्ट्स आणि गेस्टहाऊसला कुलूप लावले आहेत. त्यामुळे तिथल्या जलतरण तलावात डासांची मोठ्या प्रमाणात पैदास होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com