Goa Murder Case Dainik Gomantak
गोवा

Murder Case: तुम्हाला माझा मृतदेहच पाहायला मिळेल!

शवचिकित्सा अहवालात तरूणीच्या पोटात अन्नाचे कण सापडले नाहीत त्यामुळे आदल्या दिवशी ती उपाशीच होती.

दैनिक गोमन्तक

पणजी: 19 वर्षीय तरूणीला कामावर सोडण्यासाठी तिचे वडील गेले होते त्याच दिवशी वडिलांना तुम्हाला माझा मृतदेह (Death Body) पाहायला मिळेल, अशी धमकी तिने दिली होती, असे तिच्या वडिलांनी पोलिस (Goa Police) स्थानकात मृतदेह सापडण्यापूर्वी जबानी दिली आहे, असे पोलिस अधीक्षक शोबित सक्सेना यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले.

कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर (Calangute Beach) अर्धनग्नावस्थेत सापडलेल्या तरूणीच्या मृत्युप्रकरणीचा सर्व प्रकारे तपास सुरू असून त्यामध्ये कोणतीच कसर सोडली जाणार नाही. शवचिकित्सा अहवालात बुडून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले असले तरी ‘व्हिसेरा’ न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे (CFSL) पाठवण्यात आला आहे, असेही सक्सेना यांनी सांगितले.

तरूणीच्या बेपत्ता असल्याची तक्रार म्हापसा पोलिसात नोंद झाल्यानंतर तिचा शोध घेण्यासाठी बिनतारी संदेश सर्व पोलिस स्थानकांना पाठवण्यात आला होता. कळंगुट येथे मृतदेह सापडल्यानंतर तिच्या कुटुंबियांच्या मदतीनेच इस्पितळात ओळख पटविण्यात आली होती. वैद्यकीय शवचिकित्सा अहवालात तिच्यावर लैंगिक अत्याचार, मारहाण किंवा हिंसक प्रकार झाला नसल्याचे नमूद करण्यात आले आहे, तरीही तिचा मृत्यू इतर कारणामुळेही झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ‘व्हिसेरा’ तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. त्यात काय अहवाल येतो याच्या प्रतीक्षेत आहे, असे सक्सेना यांनी सांगितले.

कपड्यांच्या शोधात

अजूनही पोलिस अंतरवस्त्र (पँटी) वगळता तिच्या अंगावर कोणतेच कपडे नव्हते त्यामुळे त्या कपड्यांचा शोध घेण्यासाठी कळंगुट पोलिस, किनारपट्टी पोलिस तसेच काही आयआरबीच्या पोलिसांची मदत घेण्यात येत आहे. कपड्यांबाबतचा तर्क कोणीही काढू शकत नाही. जोपर्यंत ते सापडत नाहीत तोपर्यंत पुढील उलगडा होणे अशक्य आहे, असे सक्सेना म्हणाले.

ती तणावाखाली

तरूणीच्या वडिलांची जबानी पोलिस स्थानकात नोंद केली आहे. त्यामध्ये त्यांनी ती गेल्या काही महिन्यांपासून मानसिक तणावाखाली व घाबरत होती. तिला कोरोना व ब्लॅक फंगस या आजाराबाबत भीती वाटत होती, असे सांगितले आहे. तिचा मोबाईल मिळाला आहे.

पोटात पाणीच...

शवचिकित्सा अहवालात तरूणीच्या पोटात अन्नाचे कण सापडले नाहीत त्यामुळे आदल्या दिवशी ती उपाशीच होती. तिच्या फुफ्फुसामध्ये पाणी सापडल्याने तिचा बुडून मृत्यू झाल्याचा निष्कर्ष शवचिकित्सा अहवालात नमूद करण्यात आला आहे.

‘बायलांचो साद’कडून निषेध

बायलांचो सादच्या प्रमुख सबिना मार्टिन्स व त्यांच्या सहकाऱ्यांनी रविवारी नास्नोळा येथील संशयास्पदरित्या मृतावस्थेत सापडलेल्या मुलीच्या कुटुंबियाची भेट घेतली. ती बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी त्वरित शोधमोहीम सुरू करणे आवश्यक होते, अशी तक्रार आल्यानंतर पोलिसांकडून अत्यंत वेगाने तपास आवश्यक आहे. पोलिसांनी जरी पोस्टमॉर्टम रिपोर्टची माहिती जाहीर केली असली तरी अजूनही त्याची प्रत कुटुंबियाना देण्यात आली नाही, तसेच वैद्यकीय अहवाल व परिस्थितीजन्य पुराव्याशीही ती ताडून पाहिली नाही. अशा घटना घडल्यानंतर कुटुंबियांना पोलिस स्थानकात ज्या पद्धतीने वागणूक केली जाते त्याचा ‘बायलाचो साद’ ने निषेध केला. या प्रकरणात आणखी वेगवान कृती आवश्यक असून कुटुंबियांना मिळणाऱ्या माहितीचाही तपासासाठी वापर केला पाहिजे, असे मार्टिन्स म्हणाल्या.

आज सभा

तरूणीचा संशयास्पद मृत्यू व पोलिसांचा निष्काळजीपणा याचा निषेध करण्यासाठी नास्नोळा येथे आज संध्याकाळी 5 वाजता सार्वजनिक निषेध सभा होणार आहे. कुटुंबियांच्या पुढाकाराने होणाऱ्या या निषेध सभेला बायलांचो सादने पाठिंबा दिला आहे. गोव्यात महिलांविरुद्धचे गुन्हे वाढत चालले असून पोलिसांच्या बेफिकिरीविरोधात ‘बायलांचो साद’ने भूमिका घेतली असून या सभेत या प्रवृत्तीचा निषेध होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT