Murder Case: तरूणीच्या वडिलांना म्हापसा पोलिसांनी 24 तास ठेवले ताटकळत

तपासाला गती मिळाली असती तर कदाचित तीचे प्राण वाचले असते.
Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

शिवोली: नास्नोळा हळदोणा (Nachinola village in North Goa) येथील 19 वर्षीय तरूणीच्या संशयास्पद मृत्यूला (Murder Case) आता चार दिवस उलटले तरी पोलिसांकडून तपास कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे नातेवाईक आणि कुटुंबियांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, पोलिस अधीक्षकांनीही आज तपास अधिकाऱ्यांसोबत चर्चा करीत यंत्रणा अधिक गतिमान करण्याच्या सूचना केल्या आहेत. दिवसेंदिवस या प्रकरणाचे गूढ वाढत आहे.

ती खेळकर स्वभावाची होती. ती सहज इतरांमध्ये मिसळत होती. त्यामुळे तिचा कुणातरी ओळखीच्या माणसाने घात केल्याचा दाट संशय आहे, असे तरूणीच्या मावशीने ‘गोमन्तक’ला सांगितले. कळंगुटचे पोलिस निरीक्षक नोलास्को रापोझ नेहमीप्रमाणेच सिद्धी नाईक मृत्यू प्रकरणात प्रसारमाध्यमांना योग्य माहिती देत नसल्याचा आरोप रिकार्डो डिसोझा यांनी केला आहे.

Goa Crime News
Goa Crime: तरुणीच्या गुढ मृत्यूचा गुंता वाढला

24 तास थांबविले

तरूणीची बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यासाठी म्हापसा पोलिसांत गेलेल्या तिच्या वडिलांना तेथील कर्मचाऱ्यांनी कुठलीही सहानुभूती न दाखवता 24 तास थांबविले. बुधवारी दुपारपर्यंत तपासाला गती मिळाली असती तर कदाचित तीचे प्राण वाचले असते. तपासावर विश्वास नसल्याचे मोरजकर यांनी यावेळी सांगितले.

किनाऱ्यावर आढळलेला अर्धनग्नावस्थेतील  तरूणीचा मृतदेह बुडुन मरण पावल्याची विशेष चिन्हे दाखवत नव्हता. उघडे डोळे आणी  सडपातळ बांध्याची मुलगी किनाऱ्यावर झोपल्यागत वाटत होती. आणि तिच्या तोंडात किनाऱ्यावरची माती गेल्याचेही दिसत नव्हते. दरम्यान, तरूणीच्या बेपत्ता होण्याची पोलिस तक्रार करण्यासाठी म्हापसा पोलिसांत  गेलेल्या तिच्या वडिलांना तेथील कर्मचाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची सहानुभूती न दाखवता चोवीस तास थांबण्याचे सांगितले.

Goa Crime News
19 वर्षीय तरूणीच्या मृत्यू प्रकरणातील गुढ उकलेना

मात्र बुधवारी दुपारपर्यंत तपासाला गती मिळाली असती तर कदाचित तीचे प्राण वाचले असते त्यामुळे सध्याच्या पोलिसी तपासावर आपला विश्वास नसल्याचेही सौ. मोरजकर यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, या गुढ मृत्यूचा छडा लावण्याचे कडवे आव्हान सध्या गोवा पोलिसांसमोर असून दोषी व्यक्ती जो पयर्त  जगासमोर येणार नाही तोपर्यंत गप्प न बसण्याचा धाडसी निर्णय तरूणीच्या कुटुंबीयांनी घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com