Shrawan Barve murder Dainik Gomantak
गोवा

Goa Murder Case: श्रवण बर्वेचा गळा दाबून खून! शवचिकित्सा अहवालातून धक्कादायक माहिती उघड

Goa News: श्रवण बर्वेचा खून कोणी केला? तसेच कोणत्या कारणातून केला? याबाबत आता सवाल उपस्थित केला जात आहे.

Pramod Yadav

सत्तरी: श्रवण देविदास बर्वे या २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू गळा दाबल्याने झाला असल्याची धक्कादायक माहिती शवचिकित्सा अहवालातून उघड झाली आहे. आंबेडे, नगरगाव येथे हनुमान मंदिराजवळ सोमवारी (१४ एप्रिल) श्रवणचा मृतदेह आढळून आला होता. श्रवणचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्यानंतर घातपाताचा संशय पोलिसांनी वर्तवला होता दरम्यान, हा अंदाज शवचिकित्सा अहवालातून खरा ठरल्याचे समोर आले आहे.

श्रवण देविदास बर्वे (२४) या तरुणाचा मृत्यू गळा दाबल्याने जीव गुदमरुन झाला आहे. मृत्यूवेळी त्याच्या जखमा ताज्या आणि प्राणघातक होत्या, असे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. शवविच्छेदन अहलावातून समोर आलेल्या माहितीमुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. श्रवणचा खून कोणी केला? तसेच कोणत्या कारणातून केला? याबाबत आता सवाल उपस्थित केला जात आहे.

श्रवणचे आई - वडील आणि भाऊ होंडा येथील घरी राहण्यासाठी गेले होते. सोमवारी सकाळी नगरगाव येथील घरी आल्या वडिल देविदास यांना श्रवणचा मृतदेह दिसला. यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. श्रवणच्या मृतदेहाजवळून काही संशयास्पद वस्तू जप्त करण्यात आल्या होत्या. त्यामुळे श्रवणचा खून करण्यात आल्याची शंका पोलिसांनी उपस्थित केली होती.

मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार, श्रवण रविवारी रात्री आयपीएल सामना पाहून घरी परतत होता. दरम्यान, याच काळात त्याच्याशी घातपात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शवचिकित्सा अहवालातून समोर आलेल्या माहितीमुळे श्रवणच्या हत्येतील आरोपी आणि हत्येचे कारण शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर ठाकले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nepal Floods: नेपाळच्या महापुरातून 21 भारतीयांची सुखरुप सुटका, परराष्ट्र मंत्रालयाकडून यादी जाहीर; रेस्क्यू ऑपरेशन सुरु

RGP Goa: काँग्रेससोबत आघाडीसाठी 'आरजी'ची तयारी! अमोल नावेलकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची समिती; 30 दिवसांत चर्चा पूर्ण करण्याची मागणी

Dabolim Airport: दाबोळी विमानतळाच्या जागतिक क्रमवारीला मोठा धक्का! 3 महिन्यांत 12 स्थानांची घसरण; प्रवासी समाधानाचा गुणांकही 4.94 वरून 4.89 वर

FDA Raid: पर्वरीतील 3 सरकारी कँटीनवर 'एफडीए'ची कारवाई! अस्वच्छता आणि बांधकामातील गंभीर त्रुटी आढळल्याने तिन्ही कँटीन तातडीने बंद

Nepal Floods: नेपाळमध्ये महापुराचा कहर! 288 भारतीय बेपत्ता, परराष्ट्र मंत्रालय अ‍ॅक्शन मोडमध्ये; मदतीसाठी कंट्रोल रुम-हेल्पलाइन सुरु

SCROLL FOR NEXT