Goa Murder Case Dainik Gomantak
गोवा

Goa Murder Case: श्रवणचा मृत्यू गळा दाबल्याने आणि मारहाणीमुळेच, शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट; खूनाचा कट कुणी रचला?

Goa Crime: नगरगाव-आंबेडे येथील श्रवण देविदास बर्वे (वय २४ वर्षे) याचा मृत्यू गळा दाबल्याने आणि मारहाणीमुळे झाल्याचे शवचिकित्सा अहवालातून स्पष्ट झाले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई : नगरगाव-आंबेडे येथील श्रवण देविदास बर्वे (वय २४ वर्षे) याचा मृत्यू गळा दाबल्याने आणि मारहाणीमुळे झाल्याचे शवचिकित्सा अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे वाळपई भागात खळबळ उडाली आहे. श्रवण याच्या मृतदेहावर सांतईनेज-पणजी येथील स्मशानभूमीत बुधवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती मिळाली.

सविस्तर माहिती अशी, की नगरगाव-आंबेडे येथील श्रवण बर्वे याचा मृतदेह वडील देविदास यांना मंगळवारी घराजवळ आढळला होता. त्याच्या गळ्याभोवती नायलॉनची दोरी गुंडाळलेली होती.

तसेच अंगावर ठिकठिकाणी जखमा दिसून आल्या. त्यामुळे देविदास बर्वे यांनी वाळपई पोलिसांत आपल्या मुलाचा खून झाल्याची तक्रारी नोंदविली होती. श्रवणचा मृत्यू गळा आवळल्यामुळे झाल्याचे अहवालात नमूद केले आहे. मात्र, त्याचा गळा दोरीने आवळला की हाताने, याची माहिती मिळू शकली नाही. तसेच त्याचा खून नेमका किती वाजता झाला, याचीही माहिती मिळालेली नाही.

श्रवण हा सोमवारी रात्री उशिरापर्यंत म्हणजे १२ वाजेपर्यंत हनुमान मंदिराजवळ होता, असे अनेकांचे म्हणणे आहे. सध्या आयपीएल क्रिकेट सामने सुरू असल्याने तो ते सामने पाहात होता. त्यावेळी त्याने काहीजणांशी गप्पा-गोष्टीही केल्या होत्या, अशी माहिती मिळाली आहे.

श्रवण हा मनमिळावू स्वभावाचा होता. त्याने बारावीनंतर आयटीआयचा डीटीपी कोर्सही केला होता. तो काही दिवस क्रॉम्प्टन कंपनीत कामाला होता. मात्र, काही दिवसांतच त्याने ते काम सोडले होते. सध्या तो आंबेडे येथील घरात एकटाच राहायचा. शेती-बागायतीची कामे करायचा, तर कधी कधी धार्मिक कार्यक्रमांवेळी पौरोहित्यासाठीही जायचा, अशी माहिती मिळाली.

वाळपईचे पोलिस निरीक्षक विदेश शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रथमेश गावस, खुशाली नाईक, सनिषा नाईक, उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अक्षत कौशल तसेच इतर कर्मचारी तपासकामात गुंतले आहेत.

मनमिळावू श्रवणचे वैरी कोण?

श्रवण हा मनमिळाऊ स्वभावाचा होता. त्यामुळे त्याचा खून कोणी, कसा व का केला, हे कोडे उघडणे गरजेचे आहे.मात्र, त्याचा खून हा एकट्याने नव्हे, तर दोघा-तिघांनी मिळून केला असावा, असा कयास आहे. वाळपई पोलिस तपास करताना वेगवेगळ्या भागांतील लोकांचे जबाब घेत असून त्याच्या घराजवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज मिळवून खुनाचे कोडे उलगडण्याचा प्रयत्न सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ENG vs IND 3rd ODI: लॉर्ड्सवर टीम इंडियाची नवी रणनिती? ईशान-सुंदर बाहेर, 'या' दोन दिग्गजांची होणार एन्ट्री; पाहा संभाव्य Playing XI

Goa Under 19 Cricket Team: गोव्याच्या युवा संघाचा रोमहर्षक विजय, कमी धावसंख्येच्या सामन्यात हिमाचलला दोन विकेटने नमविले

Sexual Assault Case: पहिल्या मजल्याचे CCTV फुटेज गायब; पीडितेचे वर्तनही संशयास्पद, तपासातील त्रुटींवर तरुण तेजपालच्या वकिलाचा जोरदार युक्तिवाद

Sonam Wangchuk Hunger Protest: उपोषणकर्ता आजारी, की समाजव्यवस्था?

"आता नाही जागे झालात, तर कधी...?" सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरुन हटवताच भडकला विशाल ददलानी; देशवासियांना केला थेट सवाल VIDEO

SCROLL FOR NEXT