Goa Murder Case Dainik Gomantak
गोवा

Goa Murder Case: कौले ठेवण्याच्या कारणावरुन कुऱ्हाडीचे मानेवर सपासप वार, दोन भावांच्या हल्ल्यात काकाचा तडफडून मृत्यू; खाजोर्डा हादरले!

Khajorda Borim Murder Case: क्षुल्लक कारणावरून एका कुटुंबात जोरदार भांडण होऊन एकाच्या मानेवर कुऱ्हाडीचे घाव घालून खून केल्याचा प्रकार खाजोर्डा-बोरी येथे घडला.

दैनिक गोमन्तक डिजिटल

फोंडा: क्षुल्लक कारणावरून एका कुटुंबात जोरदार भांडण होऊन एकाच्या मानेवर कुऱ्हाडीचे घाव घालून खून केल्याचा प्रकार खाजोर्डा-बोरी येथे घडला. पुतण्यांनीच चुलतकाकाचा खून केल्याची ही थरारक घटना रविवारी संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास घडली. मृत इसमाचे नाव दीपक राया नाईक (वय ५८ वर्षे) असून याप्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली, तर दुसरा बेपत्ता आहे.

खाजोर्डा येथील नाईक कुटुंबीयांच्या अंगणातच ही घटना घडली. हल्लेखोर दोघे भाऊ असून गौरेश कुशन नाईक (वय २२ वर्षे) हा हत्यारासहीत बेपत्ता झाला असून त्याचा भाऊ साईदीप कुशन नाईक (वय २४ वर्षे) याला फोंडा पोलिसांनी अटक केली आहे. दीपक आणि कुशन या नाईक कुटुंबांमध्ये कायम वाद होत होते. त्याच वादाचे पर्यवसान आज खुनामध्ये झाले. साईदीपने दीपकवर दांड्याने वार केला.

त्याचवेळी गौरेशने कुऱ्हाडीने दीपकच्या डोक्यावर आणि मानेवर वार केला. वार वर्मी लागल्याने दीपक रक्ताच्या थारोळ्यात अंगणातच कोसळला आणि मरण पावला. मृत दीपक याच्या पश्‍चात पत्नी आणि एक मुलगी आहे. या घटनेवेळी प्रचंड आरडाओरड झाली. आपल्या हातून खून झाल्याचे पाहून गौरेशने पळ काढला. मात्र, साईदीप पोलिसांच्या हाती सापडला. त्याला फोंडा पोलिसांनी अटक केली असून पुढील चौकशी सुरू आहे.

कौले वाटेत ठेवल्याचा राग

दीपकने घरावर कौलांच्या जागी पत्रे घातले होते. कौले काढून वाटेच्या कडेला ठेवली होती, ती कौले आज दीपक दुसरीकडे ठेवत होता. पायवाटेच्या प्रश्‍नावरून गौरेश आणि साईदीप यांनी भांडण उकरून काढले. कौलांमुळे दुचाकी न्यायला अडचण झाली, असा कांगावा करीत या दोघा भावांनी दीपकवर हल्ला केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT