Goa Murder Case Dainik Gomantak
गोवा

Goa Murder Case: तपास यंत्रणेचा पोलीस महासंचालकांनी घेतला समाचार

तज्ज्ञांकडून न्यायवैद्यक अहवालाच्या फेरआढाव्याचे निर्देश

दैनिक गोमन्तक

पणजी:  राज्यात (Goa) गाजत असलेल्या सिद्धी नाईक संशयास्पद मृत्यू प्रकरणाच्या (Murder case) तपास यंत्रणेची पोलिस महासंचालकांनी अक्षरशः खरडपट्टी केली असून या प्रकरणाच्या शवचिकित्सा अहवालाची तज्ज्ञ डॉक्टरांकडून फेरआढाव्याचे निर्देश दिले आहेत. तपासासाठी गुन्हे अन्वेषण विभागाची मदत घेऊन गरज पडल्यास ‘एसआयटी’ची (SIT) स्थापना करावी, अशा सूचनाही दिल्या आहेत. दुसरीकडे ओबीसी महासंघाने महिला आयोगाची भेट घेऊन सखोल तपासाची मागणी केली आहे.

सिद्धी नाईक मृत्युप्रकरणी ‘तपास सुरू आहे’ असे म्हणणाऱ्या तपास यंत्रणेचा पोलिस महासंचालकांनी चांगलाच समाचार घेतला. त्यांनी अनेक सूचना आणि निर्देश दिले आहेत. पोलिसांनी सुरुवातीपासूनच पीडितेने आत्महत्या केल्याचा पवित्रा घेतल्याने डॉक्टरांनी गंभीर चुका करीत व्हिसेरा आणि स्वॅब  नमुने घेतले नाहीत. त्यामुळे एक प्रकारे पोलिसांबरोबर डॉक्टरांनीही हा तपास बंदच केला होता. आता या प्रकरणाबाबत समाजातील विविध संस्थांचा दबाव वाढत आहे.

अधिकारी निरुत्तर

आत्महत्येचे अनेक प्रकरण हाताळलेल्या पोलिस महासंचालकांनी, कपडे काढून कोणी आत्महत्या केली होती का ? असा प्रश्न तपास अधिकाऱ्यांना विचारल्यावर तपास अधिकारी निरुत्तर झाले. न्यायवैद्यक इतिहासात अशा घटना नसल्याची माहिती पुढे आली आहे.

मृत्युबाबत नियमावली

महिलांच्या संशयास्पद कोणत्याही महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्यास तातडीने पोलिस निरीक्षक आणि उपअधीक्षकांनी  घटनास्थळी भेट द्यावी अशी यापूर्वीच नियमावली बनवलेली असताना या प्रकरणात या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेटच दिली नाही अशी माहिती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT