Goa Murder Case: पोलिसांकडून लपवाछपवी, पुरावेही नष्ट

तरूणीची बदनामी थांबविण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Goa Murder Case
Goa Murder CaseDainik Gomantak
Published on
Updated on

हळदोणे: राज्यात (Goa) गाजत असलेल्या सिद्धी नाईक संशयास्पद मृत्यू प्रकरणाबाबत (Murder Case) अद्यापही ठोस कोणतीही माहिती मिळालेली नाही. चौकशी सुरू आहे, असे उत्तर पोलिसांकडून (North Goa Police) वारंवार दिले जात आहे. त्यामुळे आता विविध संघटना आक्रमक बनल्या आहेत. राष्ट्रीय ओबीसी महासंघ सिद्धीच्या न्यायासाठी मैदानात उतरला असून हे प्रकरण सीबीआयकडे (CBI) द्यावे आणि कुटुंबीयांची बदनामी थांबवावी अशी मागणी महासंघाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

सिद्धी नाईक प्रकरणाला (Goa Murder Case) बारा दिवस उलटून गेले तरी पोलिसांच्या हाती अद्याप काहीही आलेले नाही. दुसरीकडे डॉक्‍टरांनी शवचिकित्सेमध्ये निष्काळजीपणा दाखवत अनेक पुरावेच नष्ट केले आहेत. पोलिसांनी सुरवातीलाच हे प्रकरण नीट हाताळले नाही. ती बेपत्ता झाल्यावर हे प्रकरण नोंद करून घेण्यास केलेला उशीर आणि कळंगुट किनाऱ्यावर मृत आणि अर्धनग्न अवस्थेत असल्याचे त्यांना कळवले आणि वडिलांनी मृतदेहाची ओळख करून घेण्यासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात बोलवले.

आत्महत्या म्हणत शव चिकित्सेचे अर्धवट सोपस्कार पूर्ण करून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी वडिलांकडे दिला. मात्र, या प्रकरणांमध्ये अनेकांचा निष्काळजीपणा आता समोर येत आहे. या प्रकरणी अनेक प्रश्न आज ही ‘जैसे थे’ आहेत. कुटुंबीय दुःखात होते. त्यामुळे इतरांनी त्यांना संपर्क केला नाही. आता याप्रकरणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने मुख्यमंत्र्यांकडे संपर्क केला असून पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

दरम्यान, सिद्धी नाईक हिचे कुंटुबिय सध्या प्रचंड मानसिक दबावाखाली आहेत. या प्रकरणाचा तपास कुठल्या दिशेने जात आहे, याची त्यांना कोणतीही कल्पना नाही. सिद्धी नाईक हिला न्याय कधी मिळेल, या प्रतिक्षेत ते आहेत. विविध संघटना, महिला आयोग सिद्धीच्या न्यायासाठी पुढे येत आहेत.

Goa Murder Case
Goa Murder Case: सीबीआय तपासासाठी हालचाली

नातेवाईकांची केली चौकशी

याप्रकरणी सिद्धीच्या वडिलांची दोन वेळा जबानी नोंदविण्यात आली. तसेच बहिणीचीही चौकशी केली आहे. सध्या कळंगुट पोलिस तिच्या मित्राची चौकशी करीत आहेत. मात्र, नक्की माहिती काय मिळाली हे सांगण्यास पोलिस तयार नाहीत.

महिला आयोगानेही घेतली दखल

सिद्धी नाईक मृत्यू प्रकरणाचे सध्या राज्यभरात पडसाद उमटत आहेत. राज्य महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतलेली आहे. यासंदर्भात पोलिस महासंचालक तसेच मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधण्यात आलेला आहे, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विद्या गावडे यांनी सांगितले.

Goa Murder Case
Goa Murder Case: समाजमाध्यमांतून संतप्‍त प्रतिक्रिया; 'या प्रकरणाला सरकारच दोषी'

हे मृत्यू प्रकरण संशयास्पद असून पोलिस माहिती लपवत आहेत आणि सिद्धीचेच चारित्र्यहनन करून विषयाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या प्रकरणाचा मूळ तपास बाजूला ठेवून चारित्र्यावर शंका घेणे यामागे पोलिस आहेत की अन्य कोणी आहे हे तपासण्याची आता वेळ आली आहे म्हणून आम्ही या प्रकरणाची सीबीआय मागणी केली आहे.

- मधू नाईक, राष्ट्रीय ओबीसी महासंघ गोवा अध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com