Arrest Dainik Gomantak
गोवा

Goa Murder Case: गोव्यात 64 वर्षीय वृद्ध महिलेचा चाकूने गळा कापला; आसामच्या 21 वर्षीय तरुणाला अटक

Baina Murder Case: मेहरुनिसा बिडिकर (६४) या महिलेचा रविवारी खून करण्यात आला. महिला तिसऱ्या मजल्यावर एका फ्लॅटमध्ये एकटीच राहत होती.

Pramod Yadav

वास्को: बायणा येथे ६४ वर्षीय वृद्ध महिलेचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी (२१ सप्टेंबर) उघडकीस आली. याप्रकरणी मूळ आसाम येथील २१ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. मुरगाव पोलिसांनी ही कारवाई केली.

बायणा येथील नायक इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या ६४ वर्षीय वृद्ध महिलेचा रविवारी खून झाला होता. यानंतर संशयित फरार होता. मुरगाव पोलिस त्याच्या मागावर होते. अखेर संशयिताला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. तरुणाने महिलेचा खून का केला? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

मेहरुनिसा बिडिकर (६४) या महिलेचा रविवारी खून करण्यात आला. महिला तिसऱ्या मजल्यावर एका फ्लॅटमध्ये एकटीच राहत होती. दरम्यान, संशयिताने महिला एकटी असल्याचे पाहून तिच्यावर चाकूने हल्ला केला. तरुणाने महिलेचा गळा चिरल्याने तिचा मृत्यू झाला. खून करण्यासाठी वापरण्यात आलेले चाकू पोलिसांना घटनास्थळीच आढळून आला.

वृद्ध महिलेच्या मुलाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, वृद्ध महिलेने संशयिताला कोणत्यातरी गोष्टीवरुन जाब विचारला. याच राग आल्याने संशयिताने हल्ला केला. भीतीने महिलेने बाहेर धाव घेतली पण, संशयिताने चाकू हल्ला केला, प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने महिलेचा मृत्यू झाला.

पोलिसांनी तपासासाठी फॉरेन्सिक पथकाला पाचारण केले. संशयित दारुच्या नशेत असल्याचे देखील सांगितले जाते. दरम्यान, पोलिस तपासाअंतीच त्याने वृद्ध महिलेचा खून का केला समोर येण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT