Goa: गेल्या आठवडी बाजाराप्रमाणेच विक्रेत्यांना बाजारात बसण्यास प्रतिबंध (Market restrictions) करण्यात आल्याने आजही (बुधवारी) डिचोलीत आठवडी बाजार (Bicholim Weekly Market) भरलाच नाही. आठवडी बाजारात बसणारे काही पारंपरिक विक्रेते आजही बाजारात आले होते. मात्र पालिकेच्या (Bicholim Municipality) कडक भुमिकेमुळे आठवडी बाजार सुरु करण्याचे त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. त्यामुळे विक्रेत्यांची घोर निराशा झाली.
संचारबंदीनंतर अनुमती नसतानाही मागील 18 ऑगस्ट रोजी जवळपास 60 टक्के विक्रेत्यांनी आठवडी बाजारात आपला व्यवसाय सुरु करून बंद असलेला आठवडी बाजार सुरु केला होता. मात्र पालिकेने विक्रेत्यां विरोधात कारवाई करताच बाजारात गोंधळ झाला. विक्रेत्यांकडून मार्केट निरीक्षकांना दमदाटीही करण्यात आली. या प्रकाराची पालिकेने गंभीर दखल घेतली. प्रशासकीय मान्यता मिळेपर्यंत आठवडी बाजार भरता कामा नये. असे स्पष्ट निर्देश पालिकेचे मुख्याधिकारी कबीर शिरगावकर यांनी मार्केट निरीक्षकांना दिले आहेत. त्यानुसार गेल्या आठवड्यापासून आठवडी बाजार सुरु करण्याचा विक्रेत्यांचा प्रयत्न असफल ठरला आहे. आजही मार्केट निरीक्षक गजानन परवार, किर्ती मातोणकर यांच्यासह पालिकेचे कर्मचारी सकाळपासून बाजारात लक्ष ठेवून होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.