Goa Ganeshotsav: डिचोलीत या प्रसिद्ध जागेत भरणार यावर्षीचा 'माटोळी बाजार'

पारंपरिक जागेतच भरणार बाजार, पालिकेचा निर्णय (Goa Ganeshotsav)
डिचोलीतील चतुर्थी निमित्त भरणाऱ्या माटोळी बाजारातील पारंपारीक जागा (Goa Ganeshotsav)
डिचोलीतील चतुर्थी निमित्त भरणाऱ्या माटोळी बाजारातील पारंपारीक जागा (Goa Ganeshotsav)Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Ganeshotsav: 'कोविड महामारी'चे (Covide Epidemic) सावट असले, तरी मार्गदर्शक तत्वांचे पालन करून यंदा डिचोलीत (Bicholim) पूर्वीच्याच जागेत दरवर्षीप्रमाणे चतुर्थी निमित्त 'माटोळी' बाजार (Matoli Bazar) भरणार आहे. गेल्यावर्षी गणेशभक्तांची (Ganesha devotee) झालेली अडचण लक्षात घेवून, यंदा पारंपरिक जागेतच 'माटोळी' चा बाजार भरविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. बाजारातील गणपती पूजन मंडप परिसरात माटोळी बाजार भरणार असून, माटोळीचे सामान विकणाऱ्या विक्रेत्यांना (Seller) जागा आखून देण्यात येणार आहे. अशी माहिती नगराध्यक्ष कुंदन फळारी (Bicholim Mayor) यांनी दिली. त्यामुळे यंदा 'माटोळी'च्या बाजाराबाबत निर्माण झालेला गुंता सुटल्यात जमा आहे.

महामारीमुळे चतुर्थीच्या बाजारातील गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी गेल्यावर्षी बाजाराबाहेर बोर्डे वडाजवळ, श्री शांतादुर्गा विद्यालय (Shri Shantadurga School), हिराबाई झांट्ये सभागृहासमोर (Heerabai Zatye Hall) मिळून चारठिकाणी 'माटोळी'चा बाजार भरविण्यात आला होता. मात्र मुख्य बाजाराबाहेर विविध ठिकाणी माटोळीचा बाजार भरविण्यात आल्याने गेल्यावर्षी गणेशभक्तांची मोठी गैरसोय झाली होती. माटोळीचे सामान विकणाऱ्या काही विक्रेत्यांना तर मोठा आर्थिक फटका (Financial loss) सहन करावा लागला होता. मात्र गणेशभक्तांसह विक्रेत्यांच्या हिताचा विचार करून यंदा एकाच ठिकाणी बाजार भरविण्याचे पालिकेने ठरविले आहे.

डिचोलीतील चतुर्थी निमित्त भरणाऱ्या माटोळी बाजारातील पारंपारीक जागा (Goa Ganeshotsav)
Goa Vaccination: 5 सप्टेंबर पूर्वी शिक्षक वर्गाचं लसीकरण पूर्ण होणार?

पार्किंग व्यवस्था

चतुर्थीच्या काळात दरवर्षी बाजारात पार्किंगची गंभीर समस्या निर्माण होत असते. मात्र या समस्येवर नियंत्रण आणण्यासाठी पालिका इमारतीच्या मागच्या बाजूने असलेल्या मोकळ्या जागेत पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. सध्या या जागेतील चारा कापून ही जागा स्वच्छ करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

नियमांचे पालन करावे

गणेशभक्तांची अडचण होवू नये, त्यासाठी पूर्वीच्याच जागेत माटोळीचा बाजार भरणार आहे. माटोळीचे सामान विकणाऱ्या विक्रेत्यांना जागा आखून देण्यात येणार आहे. माटोळीच्या बाजारात सरकारच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन होणार त्याकडे कटाक्ष ठेवण्यात येणार आहे. गणेशभक्त ग्राहक आणि विक्रेत्यांनी सामाजिक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

- कुंदन फळारी, नगराध्यक्ष, डिचोली

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com