Actress Avantika Dassani Dainik Gomantak
गोवा

Goa Airport: विमानात बॉम्बची धमकी, अभिनेत्री भाग्यश्रीची मुलगी अडकली गोवा विमानतळावर; सहा तासांनी परतली मुंबईत

Goa Mumbai Flight: 2025 ची सुरुवात काल रात्री आमच्या फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याच्या अफवेने झाली; अवंतिका दासानी

Pramod Yadav

पेडणे: एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्रीची मुलगी अभिनेत्री अवंतिका दासानी मुंबई - गोवा फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याच्या अफवेमुळे गोवा विमानतळावर अडकून पडली. अखेर सहा तासांच्या विलंबानंतर अभिनेत्री मुंबईला परतण्यात यशस्वी झाली. अवंतिकाने Instagram वरुन याबाबत माहिती दिली आहे.

अवंतिकाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर गोवा विमानतळावरील एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये अनेक सुरक्षा कर्मचारी आणि विमानतळ कर्मचारी फ्लाइटची तपासणी करताना दिसत आहेत.

"काल रात्री आमच्या फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याच्या अफवेने 2025 ची सुरुवात झाली...," असे कॅप्शन अवंतिकाने फोटोला दिले आहे.

सोमवारी रात्री अवंतिका गोव्याहून मुंबईला परतत होती. त्याच्या इंडिगो फ्लाइटला बॉम्बच्या धमकीचा खोटा कॉल आला, यामुळे विमानाला उड्डाण करण्यापासून थांबवण्यात आले.

Indigo एअरलाइनला फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची धमकी अज्ञाताकडून मिळाली. याची माहिती समोर आल्यानंतर फ्लाइटमधील सर्वजण घाबरले होते. यानंतर प्रवाशांना विमानातून खाली उतरवण्यात आले. तसेच, प्रवाशांना विमानतळावरच वाट पहावी लागली.

अवंतिकाच्या कुटुंबीयांमध्येही भीतीचे वातावरण होते. इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत अवंतिकाने, "वर्ष 2025 ची सुरुवात काल रात्री आमच्या फ्लाइटमध्ये बॉम्बच्या अफवेने झाली." अशी माहिती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT