Devdarshan Yatra Goa Dainik Gomantak
गोवा

Devdarshan Yatra: डिसेंबरपासून राज्य सरकार पुन्हा सुरु करणार 'देवदर्शन यात्रा'

Goa News Updates: समाजकल्याण खात्याकडून सुरु केलेली 'मुख्यमंत्री देवदर्शन योजना' डिसेंबरमध्ये पुन्हा सुरु होणार

गोमन्तक डिजिटल टीम

Mukhyamantri Dev Darshan Yatra

पणजी: समाजकल्याण खात्याकडून सुरु केलेल्या 'मुख्यमंत्री देवदर्शन योजने'चा लाभ यंदाच्या वर्षी भाविक घेऊ शकतील. समाजकल्याण खात्याचे संचालक अजित पंचवाडकर यांनी रविवारी (दि. 27 ऑक्टोबर) रोजी गोव्यातील एका वृत्तपत्राशी संवाद साधताना याबद्दल माहिती दिली.

राज्यातील 60 वर्षांवरील रहिवाशांना देवदर्शन घडवावे या हेतूने सरकारने वर्ष 2022 मध्ये मुख्यमंत्री देवदर्शन योजना सुरु केली होती. या योजनेअंतर्गत राज्यातील भाविकांना तिरुपती, शिर्डी आणि वालंकिणी येथे रेल्वेने नेले जायचे. 7 नोव्हेंबर 2022 पासून सुरु झालेल्या या योजनेचा लाभ आत्तापर्यंत सुमारे बारा हजार भाविकांनी घेतलाय. 2 मार्च 2023 नंतर योजनेअंतर्गत रेल्वेची सेवा ठप्प झाली होती.

या योजनेअंतर्गत सध्या 8,838 अर्ज प्रलंबित आहेत. यांमधील सर्वाधिक 7,543 अर्ज तिरुपतीच्या दर्शनासाठी, 702 अर्ज वालंकिणीच्या दर्शनासाठी आणि 593 अर्ज शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी प्रलंबित असल्याची माहिती संजालकल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.

मुख्यमंत्री देवदर्शन योजनेसाठी ठेवण्यात आलेला निधी खर्च झाल्याने ही योजना काही काळासाठी स्थगित ठेवण्यात आली होती, तसेच गोमंतकियांमध्ये ही लोकप्रिय योजना असून ती लवकरात लवकर सुरू व्हावी अशी समस्त जनतेची अपेक्षा होती. निधीची तरतूद केल्यानंतर एप्रिल 2023 पासून पुन्हा एकदा ही योजना सुरु होईल असे सुभाष फळदेसाई म्हणाले होते आणि त्यानुसार काही काळाच्या विलंबानंतर राज्यात मुख्यमंत्री देवदर्शन यात्रा सुरु होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लग्न शक्य नाही माहिती असतानाही महिला संमतीने शारीरिक संबंधात असल्यास त्याला बलात्कार म्हणता येत नाही; हायकोर्ट

Navratri Colours 2025: नवरात्र सुरु व्हायला काहीच दिवस बाकी! 9 दिवसांचे 9 रंग जाणून घ्या; शॉपिंगला सुरुवात करा

Horoscope: झटपट श्रीमंत होण्याची संधी! 'या' राशींसाठी मंगळाचे गोचर ठरणार 'वरदान'; मात्र काही लोकांनी राहावे सावधान

Goa Live Updates: धारगळमध्‍ये होणार यंदाचा ‘आयुर्वेद दिन’

Marcel: माशेल मांस मार्केटवर जीवघेणं छप्पर! ग्राहक- विक्रेत्यांची जीवघेणी कसरत; तातडीने दुरुस्तीची मागणी

SCROLL FOR NEXT