Caste Certificate: जातीचा दाखला मिळवण्याची प्रक्रिया झाली सुलभ! समाज पत्राची अट रद्द; गोवा सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

Goa online caste certificate: सरकारच्या या निर्णयामुळे जातीचा दाखला मिळवण्याची प्रक्रिया सुलभ झाली असून, अर्जदारांना आता स्वतंत्र समाज प्रमाणपत्रासाठी धावाधाव करावी लागणार नाही.
Court Order, summons
Court Order, summons Canva
Published on
Updated on

पणजी: राज्य सरकारने जातीचा दाखला मिळवण्यासाठी लागणारे ‘समाज प्रमाणपत्र’ सादर करण्याची अट रद्द केली आहे. यापूर्वी अन्य मागासवर्ग (ओबीसी) समाजातील नागरिकांना जातीचा दाखला मिळविण्यासाठी संबंधित समाज संघटनेकडून प्रमाणपत्र घेणे बंधनकारक केले होते.

नव्या अधिसूचनेनुसार, ही अट रद्द करून त्वरित अंमलात आणण्यात आली आहे. आतापर्यंत गोवा ऑनलाईन या शासकीय संकेतस्थळावरून जातीचा दाखला मिळवण्यासाठी अर्ज करताना संबंधित समाज संघटनेकडून प्रमाणित कागदपत्र जोडणे आवश्यक होते.

गोमंतक भंडारी समाजाच्या नेत्यांनी याविरोधात गोवा राज्य मानवाधिकार आयोगाकडे दाद मागितली होती. समाजाची समिती आणि समांतर समिती, असा वाद आहे. समांतर समितीमधील काहीजणांनी ही दाद मागत समाज दाखला अनिवार्य करू नये, असा आदेश आयोगाकडून मिळवत समाज समितीवर मात केली होती. आता हा आदेश सर्व समाजांना लागू झाला आहे.

Court Order, summons
GMC Reservation: महत्वाची बातमी! वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणात OBC आरक्षण लागू; आरोग्य खात्याकडून आदेश जारी

या निर्णयामुळे समाज संघटनांचे महत्त्व मोडीत निघणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या जातनिहाय जनगणनेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा आहे. या निर्णयामुळे मात्र जात पडताळणी करण्याची सरकारी यंत्रणेवरील जबाबदारी वाढली आहे.

Court Order, summons
Gomantak Bhandari Samaj: भंडारी समाजाची 3 शकले! वाद पोहोचणार पंतप्रधान मोदींपर्यंत; एकमेकांवर दोषारोपाने वाढला गोंधळ

धावाधाव आणि शुल्कापासून मुक्तता

सरकारच्या या निर्णयामुळे जातीचा दाखला मिळवण्याची प्रक्रिया सुलभ झाली असून, अर्जदारांना आता स्वतंत्र समाज प्रमाणपत्रासाठी धावाधाव करावी लागणार नाही. आजवर प्रत्येक समाजाचे सदस्य असणे बंधनकारक असे. त्यासाठी त्या व्यक्तीकडून शुल्क घेतले जात असे. त्यानंतर तो आमच्या समाजाचा आहे, असे प्रमाणपत्र संबंधित संघटनेकडून दिले जात असे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com