Dindi Mahotsav: टाळ-मृदुंगाचा ताल आणि विठुनामाचा गजर! खरपालात ‘दिंडी महोत्सव’ उत्साहात..

Kharpal Dindi Mahotsav: विठुनामाचा गजर आणि टाळ-मृदुंगाच्या तालावर गुरुवारी दसऱ्याच्या दिवशी खरपाल येथे 'दिंडी महोत्सव' अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला.
Kharpal Dindi Mahotsav
Kharpal Dindi MahotsavDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: विठुनामाचा गजर आणि टाळ-मृदुंगाच्या तालावर गुरुवारी दसऱ्याच्या दिवशी खरपाल येथे 'दिंडी महोत्सव' अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. कला आणि संस्कृती खात्याच्या विद्यमाने आणि श्री शांतादुर्गा सातेरी केळबाई देवस्थानच्या सहकार्याने रॉयल युथ ब्रिगेड स्पोर्ट्स आणि कल्चरल क्लबतर्फे या भव्य दिंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

या दिंडी महोत्सवात वेगवेगळ्या भागातील मिळून १२ पथके सहभागी झाली होती. दिंडी महोत्सवावेळी खरपाल गावात भक्तिमय आणि उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाले होते. प्रमुख पाहूणे तथा माजी आमदार नरेश सावळ यांच्या हस्ते या दिंडी महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आहे.

याप्रसंगी खास अतिथी म्हणून साळच्या सरपंच नीता मेघ:श्याम राऊत उपस्थित होत्या. अन्य मान्यवरात लाटंबार्सेचे सरपंच डॉ. रामा गावकर, उपसरपंच हर्षदा परवार, पंचसदस्य त्रिशा राणे, नरेश गावस, कृष्णा आरोलकर, दिलीप वरक, मनोहर शिंदे, माजी सरपंच ज्ञानेश्वर गावस, मुळगावची माजी सरपंच विद्या परब, आयोजक क्लबचे अध्यक्ष रुपेश गावस, देवस्थानचे महाजन मधू गावस, उल्हास गावस, भिकाजी गावस आणि वासू गावस यांचा समावेश होता.

Kharpal Dindi Mahotsav
Navratri Special: कामालाच आनंद मानणारी, आव्हानांना सामोरे जाण्याची ऊर्जा देणारी 'महिला उद्योजिका'; दुर्गेचे आधुनिक रुप

संकट आले म्हणून विचलित होऊ नका. जीवनात सत्कार्य करा. असा सल्ला नरेश सावळ यांनी यावेळी बोलताना दिला. डॉ. रामा गावकर आणि अन्य मान्यवरांची यावेळी भाषणे झाली. ज्योत्स्ना गावस हिने सूत्रसंचालन केले.

Kharpal Dindi Mahotsav
Shankhnad Mahotsav: न भूतो, न भविष्‍यति! शंखनाद महोत्सवासाठी जोरदार तयारी; लाखो भाविक लावणार उपस्‍थिती

स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण

यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पंचक्रोशीतील कलाकारांचा सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींमध्ये कृष्णा गावस, अबोले गावस (खरपाल), लक्ष्मी घाडी,

श्रीमती घाडी (कासारपाल), सुविधा बोर्डेकर, विवेक सावंत (लाडफे), दर्शना नाईक, इंदिरा नाईक (मेणकुरे), राजेंद्र गावकर, गोपाळ गावकर (उसप), गंगा रामा वरक (मुळगाव), सुहासिनी गावकर (नानोडा) आणि जयमाला नाईक (साळ) यांचा समावेश होता. माजी आमदार नरेश सावळ यांचाही यावेळी आयोजकांतर्फे सत्कार करण्यात आला. चतुर्थीनिमित्त क्लबतर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्यांना यावेळी बक्षिसे देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com