Viriato Fernandes Dainik Gomantak
गोवा

Viriato Fernandes: गोव्यात कायमच राहण्यासाठी येऊ नका, काँग्रेस खासदाराने देशातील पर्यटकांना असे आवाहन का केले?

Goa MP Viriato Fernandes Advises Tourists: गोव्यात स्थायिक होण्याचा प्लॅन बनवणाऱ्यांना दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस यांनी विचित्र सल्ला दिला. माध्यमाशी बोलताना त्यांनी दिलेल्या सल्ल्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

Manish Jadhav

पश्चिम घाटात वसलेला गोवा देश-विदेशातील पर्यटकांना भुरळ घालतो. दरवर्षी येथे मोठ्यासंख्येने पर्यटक येतात. गोव्यात जसे लोक पर्यटनासाठी येतात तसेच कामासाठीही येतात. कामाच्या शोधात येणारे लोक काही वर्षांनी येथेच स्थायिक होतात. गोव्यात स्थायिक होण्याचा प्लॅन बनवणाऱ्यांना दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस यांनी विचित्र सल्ला दिला. माध्यमाशी बोलताना त्यांनी दिलेल्या सल्ल्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. विरियातो म्हणाले की, गोव्यात पर्यटक म्हणून राहा पण गोव्याचे रहिवासी बनू नका, कारण गोव्यात पाण्याची समस्या आहे.

गोव्याचे रहिवासी बनू नका: काँग्रेस खासदार

विरियातो म्हणाले की, ''जर तुम्ही गोव्यात (Goa) स्थायिक होण्याचा विचार करत असाल तर तो प्लॅन रद्द करा, पर्यटक म्हणून गोव्यात या पण गोव्याचे रहिवासी बनू नका. गोव्यात सध्या पाणी, जमीन आणि कचरा अशा अनेक समस्या आहेत. आम्हा गोव्यातील लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. जर तुम्ही गोव्यात स्थायिक होण्याचा विचार करत असाल तर तुम्हालाही अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. म्हणून गोव्याचे रहिवासी बनण्याचा विचार करु नका.''

'पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो'

विरियातो पुढे म्हणाले की, 'गोव्यातील सरकार पाणी, जमीन आणि कचरा यासारख्या मूलभूत समस्या सोडवू शकत नाही. जर तुम्ही गोव्यात राहाल तर आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागेल. आम्हाला पिण्याचे पाणी मिळू शकणार नाही, त्यामुळे तुम्ही गोव्यात स्थायिक होण्याचा प्लॅन करु नका.'

विरियातो यांनी नुकतीच पाण्याची समस्या सोडवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वाची बैठक घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT