राज्यात गेले काही दिवस सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे बहुतांश भागात पाणी साठून रस्ते पाण्याखाली गेले आहेत.  Danik Gomantak
गोवा

Goa: राज्यातील बहुतांश रस्ते पाण्याखाली

अनेक वर्षांच्‍या समस्‍येकडे दुर्लक्ष, भूमिगत गटारांची पुन्‍हा बांधणी करणे झाली नसल्याने राज्यातील बहुतांश भागात पाणी साठून रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी: एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा घडू लागली की, ‘नेमेची येतो पावसाळा!’ असा वाक्‍यप्रचार वापरला जातो. जोरदार पाऊस (rain) आली की, पणजीत (Panaji) पाणी तुंबण्‍याचा प्रकार गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. अर्धा तास पाऊस पडला की, रस्‍ते पाण्‍याखाली जातात आणि वाहनचालकांना त्‍यातून मार्गक्रमण करावे लागते. राज्यात गेले काही दिवस सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे बहुतांश भागात पाणी (Water in most areas due to rain) साठून रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

सध्या राज्यात जोरदार पाऊस सुरू असून पणजीतील विविध भागांत अद्यापही रस्ते पाण्याखाली आहेत. परवाच्या पावसात तर पणजी अक्षरश: तुंबली. पणजीतील विविध भागांत अनेक ठिकाणी तलावसदृश स्‍थिती निर्माण झाली. १८ जून रस्ता, सांतिनेज, पोलिस मुख्यालयासमोरील भाग, मळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, पणजी बसस्थानक, सांतामोनिका जेटीसमोर भाग, पाटो प्लाझा आदी भागात रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत.

जागतिक पर्यटन क्षेत्र असलेल्या राजधानी पणजी शहरात प्रत्येक पावसात पाणी तुंबते. स्मार्ट सीटी म्हणून विकास प्रकल्प राबवताना पावसाच्या तुंबणाऱ्या पाण्यावर योग्य तो तोडगा काढण्यास सरकार आणि महापालिका पूर्णपणे अपयशी ठरली आहे. त्याचा फटका पणजीतील नागरिकांसोबतच पणजीत नोकरी व इतर कामासाठी येणाऱ्या नागरिकांना बसत आहे. गेली अनेक वर्षे दरवर्षी ही समस्या आहे. मात्र, महानगरपालिकेवर अनेक वर्षे सत्ता स्थापूनही आमदार बाबूश मोन्सेरात हे तुंबणाऱ्या पाण्याची समस्या सोडवू शकलेले नाहीत. सरकार व महापालिका यांच्या अकार्यक्षमतेमुळे पणजीत पाणी तुंबत आहे.

नदीची पातळी समान,असल्याने परिणाम

पणजी शहराची जमीन पातळी मांडवी नदी व अरबी समुद्राला (शून्‍य सपाटी) समांतर आहे. त्यामुळे भरलेल्या मांडवीत पावसाचे पाणी गटाराद्वारे सुरळीत जाऊ शकत नाही. ते मध्‍येच अडकून राहाते आणि पणजीतील रस्‍ते पाण्‍याखाली येतात. भरती, ओहोटीचाही परिणाम होतो. मांडवी नदीला जोडलेली मोठी गटारे पुन्हा बांधण्याची गरज असून महापालिका त्यादिशेने काम करणार आहे. (आग्नेल फर्नांडिस, आयुक्त, पणजी महानगरपालिका )

जोरदार पावसामुळे मडगाव लगतच्या भागातील रस्ते पाण्याखाली

गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे विशेषतः मडगाव लगतच्या ग्रामीण भागात रस्ते पाण्याखाली जाऊन त्यांना तलावसदृश स्‍वरुप आलेले पाहायला मिळत आहे. काही भागात गुडघाभर पाण्यातून लोकांना ये - जा करावी लागत आहे. मडगावच्या हद्दीलगत आके बायश, दवर्ली, रुमडामळ, राय, बाणावली, नावेली तसेच नुवे या पंचायती येतात. त्यातील नावेली वगळता अन्य बहुतेक ठिकाणी अशीच स्थिती आहे.

सर्वाधिक समस्या आके बायश, दवर्ली, रुमडामळ व राय या पंचायत क्षेत्रांत आहे. या ठिकाणी पावसाचे पाणी वाहून जायला वाटा नाहीत. त्यामुळे रस्त्यालगतची गटारे भरून पाणी रस्त्यावर येते व ते बुडतात. बहुतेक पंचायतीत पावसापूर्वी गटारांचा उपसा होत नाही व त्यांतून ही समस्या निर्माण होते. या रस्‍त्‍यांचे डांबरीकरण व दुरुस्ती जरी सार्वजनिक बांधकाम खाते करत असले, तरी गटारांची देखभाल पंचायतींनी करावयाची असते. पण, निधीचे कारण पुढे करून पंचायती ती कामे टाळतात. त्‍यामुळे पावसाळ्यात गेली अनेक वर्षे ही समस्या निर्माण होत असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IAF Dinner Menu: रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान; भारतीय वायुसेनेचा मेनू व्हायरल, पाकच्या उद्धवस्त एअरबेसची नावे पदार्थांना दिली

Konkan Railway: आरक्षित डब्बा न जोडताच धावली कोकण रेल्वे; प्रवाशांना उभं राहून करावा लागला प्रवास

Goa Bus Accident: कदंब बसच्या धडकेत 23 वर्षीय तरुणी ठार, एकजण जखमी, वेर्णा येथे भीषण अपघात; चालकाविरोधात गुन्हा दाखल

Cricketer Threat: 5 कोटी दे...टीम इंडियाच्या स्टार खेळाडूला अंडरवर्ल्डकडून धमक्या, दाऊद टोळीचं नाव समोर

Opinion: मायक्रोसॉफ्ट नाही, 'झोहो शो'! केंद्रीय मंत्र्यांनी दिला स्वदेशी सॉफ्टवेअरला 'प्राइम टाइम' बूस्ट

SCROLL FOR NEXT