Goa Unemployment  Dainik Gomantak
गोवा

Unemployment in Goa: गोवा सर्वाधिक साक्षर, पण बेरोजगारीतही आघाडी; देशात 'या' क्रमांकावर

Akshay Nirmale

Unemployment in Goa: देशातील बेरोजगारीचा दर तीन महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. अशात गोव्यातील सध्याची बेरोजगारीची परिस्थितीदेखील निराशाजनक आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) ने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार गोव्यात बेरोजगारीचा दर 15.9 टक्के इतका उच्च आहे.

जो राष्ट्रीय सरासरी 7.8 टक्क्यांच्या दुप्पट आहे. सर्वाधिक साक्षर असलेल्या राज्यांमध्ये गोवा असूनही बेरोजगारीत सातव्या क्रमांकावर आहे.

जानेवारी 2023 मध्ये, राज्याचा बेरोजगारीचा दर 16.5 टक्के होता, जो फेब्रुवारी 2023 मध्ये 11.1 टक्क्यांवर घसरला. परंतु मार्च 2023 मध्ये पुन्हा बेरोजगारीचा दर 15.9 टक्क्यांवर गेला.

आकडेवारी दर्शवते की रोजगाराची परिस्थिती ही चिंतेची बाब आहे आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी आणि नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी पुढाकार या समस्येचे निराकरण करण्यासाठी पुरेसे नाही.

देशातील अनेक राज्ये उच्च बेरोजगारी दरांसह संघर्ष करत आहेत. सर्वाधिक प्रभावित राज्यांमध्ये हरियाणा, राजस्थान आणि केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीर यांचा समावेश आहे.

बेरोजगारीच्या दरामध्ये देशात हरियाणा अव्वल स्थानावर आहे. येथे 26.8 टक्के बेरोजगार आहेत. यानंतर राजस्थानचा क्रमांक लागतो, तिथे बेरोजगारीचा दर 26.4 टक्के आहे तर जम्मू आणि काश्मीरमध्ये बेरोजगारीचा दर 23.1 टक्के आहे.

सिक्कीमलाही बेरोजगारीचा मोठा फटका बसला असून, राज्यातील 20.7 टक्के लोकसंख्या सध्या बेरोजगार आहे. बिहार आणि झारखंड या दोन सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्यांमध्ये अनुक्रमे 17.6 टक्के आणि 17.5 टक्के बेरोजगारीचा दर आहे.

दरम्यान, गोवा सरकारने जानेवारीमध्ये दावा केला होता की नऊ ट्रान्सजेंडर्ससह 1.42 लाखांहून अधिक व्यक्ती राज्य एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये नोंदणीकृत आहेत परंतु त्यामध्ये हे सर्वचजण नोकरीच्या शोधात नसावेत, असेही म्हटले होते.

4 फेब्रुवारी 2019 ते 31 डिसेंबर 2022 रोजी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजच्या ऑनलाइन सेवा सुरू झाल्यापासून विभागाकडे एकूण 75,684 पुरुष, 66,685 महिला आणि नऊ ट्रान्सजेंडरची नोंदणी केली होती.

गेल्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या मेगा जॉब फेअरमध्ये मुलाखत घेतलेल्या पाचपैकी एका तरुणाला नोकरीची ऑफर दिली होती, असे सरकारने म्हटले होते. राज्याने आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात क्रूझ लायनर्स, एअरलाइन्स, फार्मा, हॉटेल, हॉस्पिटॅलिटी, आयटी, बँकिंग आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील 170 हून अधिक कंपन्यांचा सहभाग होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT