मुरगाव पालिका मार्केट समितीचे पदाधिकारी विक्रेत्याशी बोलताना (Goa) Dainik Gomanatak
गोवा

Goa: अतिक्रमण करणाऱ्या परप्रांतीय विक्रेत्यांना मुरगाव पालिकेचा दणका

गेल्या काही महिन्यांमध्ये विक्रेत्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली

Dainik Gomantak

Goa: रस्त्यावर व दुकानासमोरच्या जागेवरील अतिक्रमणे मुरगाव पालिकेने (Mormugao Municipality) सकाळी हटविल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले, त्याचबरोबर अशी जेमतेम कारवाई किती दिवस चालणार, असा प्रतिप्रश्नही पालिकेसमोर उपस्थित केला. मुरगाव पालिका मार्केट समितीचे अध्यक्ष मातियस (मोती) मोंतेरो यांनी अतिक्रमणे (Encroachment) करणाऱ्या विक्रेत्यांचे लाड केले जाणार नसल्याचा इशारा दिला. विक्रेत्यांनी आपल्या जागेच्या मर्यादेत राहून व्यवसाय करावा, त्यासाठी आमची कोणतीही आडकाठी नाही, मात्र जागेची मर्यादा तोडणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशारा अध्यक्ष मोंतेरो यांनी स्पष्टपणे दिला.

येथील भाजी, फळ, किराणा माल वइतर विक्रेत्यांनी (Fruit & Vegetable Seller) आपल्या दुकानांसमोरच्या जागेवर तसेच रस्त्यावर अतिक्रमणे करून मालविक्री सुरु केल्याने ग्राहकांना (Buyer at Mormugoa) बाजारात फिरताना अडथळा होत होता. गेल्या तीन ते चार महिन्यांमध्ये विक्रेत्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे, त्यात परप्रांतीय विक्रेत्यांच्या रस्त्यावर केलेल्या अतिक्रमणामुळे वाहनचालक, पादचारी यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. मुरगाव पालिका निरीक्षकांना अतिक्रमण करणारे विक्रेते जुमानत नव्हते. त्यांच्याशी दादागिरीची भाषा केली जात होती. याप्रकरणी मुरगाव पालिकेच्या एकंदर भूमिकेबद्दल नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत होता. नवीन पालिका मंडळ ही अतिक्रमणे करणाऱ्यांना अभय देण्यासाठी अस्तिवात आहे का, असा सवालही उपस्थित केला जात होता.

मुरगाव पालिका मार्केट समितीचे अध्यक्ष मोंतेरो, सदस्य प्रजय मयेकर, विनोद किनळेकर व नगरसेवक नारायण( दिलिप) बोरकर यांनी याप्रकरणी लक्ष घालून ती अतिक्रमणे हटविण्यासाठी पुढाकार घेतला. त्यानुसार त्यांनी विक्रेत्यांना ती अतिक्रमणे हटविण्यासंबंधी आगाऊ सूचना केली. अतिक्रमणे न हटविल्यास सोमवारी (ता. २०) कारवाई करण्याचा इशाराही दिला होता. कारवाई होणार असल्याचा माहिती अतिक्रमणे करणारयांना गेल्याने साळगावकर इमारती लगतच्या अंतर्गत रस्त्यावर दुतर्फा अतिक्रमणे करून मालविक्री करणारे सोमवारी गायब झाले. त्यांनी आपला माल ठिकठिकाणी लपवून ठेऊन इतर ठिकाणी फिरत असल्याचे दिसून आले. अतिक्रमणे हटविण्यात आली की नाही यासंबंधी सकाळी अकराच्या दरम्यान मोती मोंतेरो, प्रजय मयेकर, विनोद किनळेकर, दिलिप बोरकर, पालिका निरीक्षक सेबी यांनी पाहणी करण्यास आरंभ केला.

पाहणी दरम्यान काहीजणांचे विक्रीचे सामान जागेच्या मर्यादेपेक्षा एक मीटर बाहेर असल्याचे दिसून आल्याने त्यांना माल हटविण्याची सूचना करण्यात आली. काहीजणांची भाजी दुकाने हटविण्यात आली. काहीजणांनी उन्हपावसापासून बचाव करण्यासाठी आपल्या दुकानासमोर मोठे प्लास्टिक घातल्याने नागरिकांना फिरणे गैरसौयीचे होत असे. ते प्लास्टिक कापड हटविण्यात आले. आपल्या मूळ जागेपासून रस्त्यावर आलेल्यांना पुन्हा मागे हटविण्यात आले. कारवाईप्रसंगी कोणीही विरोध केला नसल्याने संपूर्ण रस्ता मोकळा झाला.

त्यानंतर फळ विक्रेत्यांकडे मोर्चा वळविण्यात आला. त्यांनीही जागांची मर्यादा सोडून सुमारे एक दोन मीटर्सपर्यंत अतिक्रमणे केली होती. ती हटविण्यात आली. तसेच पुन्हा अतिक्रमणे केल्यास सक्त कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. भाजी मार्केट विक्रेते संघटनेचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांनीही या कारवाईचे समर्थन व स्वागत केले. विक्रेत्यांनी अतिक्रमणे करू नये असे आवाहनही त्यांनी केले. मोंतेरो यांनीही विक्रेत्यांनी योग्य सहकार्य करावे असे आवाहन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: कशाला घाई केली मित्रा...! Shubman Gill चा स्वतःच्या पायावर धोंडा, भडकला गौतम गंभीर; टीम इंडिया अडचणीत

Goa Assembly: आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेवरुन आलेमाव बरसले, 'सत्तरी' पॅटर्नवर उपस्थित केले सवाल; वाचा दिवसभरातील घडामोडी

IND vs ENG: इंग्लंडमध्ये केएल राहुलचा जलवा, करिअरमध्ये पहिल्यांदाच नोंदवले 'हे' 3 मोठे रेकॉर्ड; लवकरच गावस्करांनाही सोडणार मागे!

महात्मा गांधी म्हणाले होते 'दारु सोडा', अवैध मद्य तस्करीवरुन विजय सरदेसाईंनी दिले PM मोदींच्या गुजरातचे उदाहरण

Viral Video: आजीबाईचा 'स्वॅग'च निराळा! सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय तूफान व्हायरल; तुम्ही पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT