Goa Mopa Police  Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport: 'मोपा'ला पोलिसांची सुरक्षा लाभल्याने परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी होणार फायदा

Mopa Airport: मोपा विमानतळ लोकार्पणाच्या पार्श्‍वभूमीवर गोवा पोलिस दलाने आपला स्वतंत्र वाहतूक कक्ष सुरु केला आहे.

दैनिक गोमन्तक

Mopa Airport: मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचे लोकार्पण 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर गोवा पोलिस दलाने आपला स्वतंत्र वाहतूक कक्ष सुरू केला आहे. त्या ठिकाणी 62 पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. याचा मोपा परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी फायदा होणार आहे.

गोवा पोलिस दलाच्या माहितीनुसार, काल विविध पोलिस ठाण्यातील 62 पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या मोपा विमानतळावर केल्या आहेत. यामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये मोपा विमानतळ पोलिस स्टेशन आणि मोपा वाहतूक कक्ष अशी नियुक्तीची विभागणी आहे.

मोपावर  नियुक्ती केलेल्यांमध्ये 4 पोलिस उपनिरीक्षक, 6 सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, 21 हेड कॉन्स्टेबल, 31 पोलिस कॉन्स्टेबल आदींचा समावेश आहे. विमानतळाच्या लोकार्पणापूर्वीच सुरक्षा महत्त्वाची बनल्याने पोलिस दलाने हा निर्णय घेतला. लवकरच कर्मचारी आपापल्या पोस्टिंग जागी तैनात होतील, अशी माहिती पोलिस मुख्यालयाने दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shri Ram Digvijay Yatra: 'माझ्या मागे श्री रामाचे बळ'! बद्रीनाथ ते काणकोणपर्यंत श्रीराम दिग्विजय रथाचा प्रवास; चालकाचे 8000 किमी सारथ्य

Usgao: जिलेटीनचा स्फोट, दगडाची वाहतूक; उसगावात रात्री चालतो छुपा कारभार; बेसुमार डोंगरकापणीमुळे नागरिक भयभीत

Goa Road Repair: '15 दिवसांत रस्‍त्‍यावर एकही खड्डा दिसणार नाही', मंत्री कामत यांचे आश्वासन; कंत्राटदारांना निर्देश दिल्याचे स्पष्टीकरण

Goa Politics: खरी कुजबुज; युती कुणाला नको?

Goa Politics: 'त्यांना जर जवळ केले तर लोक काय म्हणतील'? फुटिरांच्या विरोधात LOP आलेमाव यांचा सवाल; इजिदोरच्या फॉरवर्ड प्रवेशावर नाराजी

SCROLL FOR NEXT