9th World Ayurveda Congress: 'नवव्या जागतिक आयुर्वेद काँग्रेस'मध्ये 60 देशांचा सहभाग

9th World Ayurveda Congress: आयुर्वेद एक्स्पोमध्ये 250 हून अधिक स्टॉल्स उभारले असून यात देशासह परदेशातील उत्पादक देखील सहभागी झाले आहेत.
9th World Ayurveda Congress 2022
9th World Ayurveda Congress 2022 Dainik Gomantak
Published on
Updated on

9th World Ayurveda Congress: पणजी येथे नववी जागतिक आयुर्वेद काँग्रेस आणि आरोग्य एक्स्पोला आजपासून प्रारंभ होत आहे. जगभरातील 60 देशांमधून सुमारे 5 हजार आयुर्वेद स्टेकहोल्डर्स-उद्योजक, चिकित्सक, पारंपारिक उपचार करणारे वैद्य, शिक्षणतज्ज्ञ, विद्यार्थी, औषधी उत्पादक, मार्केटिंग तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. चार दिवशीय परिषदेचे 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी समारोप करतील.

जागतिक आयुर्वेद फाउंडेशन आणि केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने आयोजित केला आहे. आयुर्वेद एक्स्पोमध्ये 250 हून अधिक स्टॉल्स उभारले असून यात देशासह परदेशातील उत्पादक देखील सहभागी झाले आहेत.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले, की सकाळी 11 वाजता होणाऱ्या उद्‍घाटन सोहळ्याला केंद्रीय आयुषमंत्री सर्बानंद सोनेवाल, आयुष राज्यमंत्री डॉ. मुंजपरा कालूभाई, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांच्यासह जगभरातील 60 देशांचे 600 प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. यासाठी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

9th World Ayurveda Congress 2022
Goa Petrol-Diesel Price: पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल; गोव्यातील दर जाणून घ्या

दोन लाख लोक देणार भेट

कार्यक्रम कला अकादमी, डी. बी. बांदोडकर स्टेडियम, साग स्टेडियम, आयनॉक्स कोर्टयार्ड, एनआयओ सभागृहात होत आहे. यात गुरु शिष्य परंपरा, तज्ज्ञांची व्याख्याने, औषधी वनस्पतीवर चर्चासत्रे, आयुष क्लिनिक्स, सॅटॅलाइट सेमिनार आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. ४ दिवसांत २ लाख लोक उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे.

चार दिवस आयुर्वेद ओपीडी

या चार दिवस सुरू राहणाऱ्या परिषदेत आयुर्वेद ओपीडी सुरू राहणार असून यामध्ये मोफत चिकित्सा आणि उपचार केले जाणार आहेत. यात सर्व प्रकारच्या आजार आणि व्याधींची चिकित्सा करून त्यावरील औषधे देखील दिली जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

RGP Congress Alliance Talks Goa:
Dabolim Airport Ranking Decline
vuijai sardesai & Mallikarjun Kharge
Mallikarjun Kharge Goa visit
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com