Sudeep Tamhankar | Goa News   Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport News: ‘मोपा’वर टॅक्सी व्यवसायासाठी स्थानिकांना संधी द्या' - सुदीप ताम्हणकर

Mopa Airport News: आरटीएकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे स्पष्ट झालेले आहे.

दैनिक गोमन्तक

Mopa Airport News: मोपा विमानतळावर टॅक्सी व्यवसायात येऊ इच्छिणाऱ्या युवकांना रोजगार मिळावा, या संदर्भात पेडणे वाहतूक कार्यालयाला निवेदनाद्वारे टॅक्सी स्टँडचा प्रस्ताव तयार करण्याची विनंती केली होती. पण अद्याप काहीच हालचाल दिसत नाही, त्यामुळे आज पुन्हा सुदीप ताम्हणकर यांनी युवकांना संधी द्यावी, या मागणी संदर्भात स्मरणपत्र दिले.

प्रस्तावित टॅक्सी स्टँडसाठी भूसंपादन केले, नाही, हे तपासण्याची विनंतीही केली होती. पण चौदा दिवस उलटूनही पेडणे वाहतूक खात्याने अद्याप आम्हांला कसलीही माहिती दिलेली नाही. वाहतूक खात्याने यासंबंधीची माहिती त्वरित द्यावी, यासंबंधीची माहिती न दिल्यास पुढची पावले उचलली जातील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. त्यांच्यासोबत नितीन नर्से होते.

मोपा विमानतळ टॅक्सी स्टँडचा प्रश्न सोडविण्यासाठी आरटीएची बैठक आजपर्यंत घेण्यात आलेली नाही. तसेच आरटीएकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे स्पष्ट झालेले आहे.

मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टॅक्सी सेवा सुरू करण्याबाबत अनेक शासकीय अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी बिनबुडाचे वक्तव्य करून या तरुणांची दिशाभूल करत आहेत, असेही सुदीप ताम्हणकर व राजू नर्से यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT