Mopa airport parking fee hike Dainik Gomantak
गोवा

मोपा विमानतळावर पार्किंग शुल्क वाढविल्याने टॅक्सी चालक आक्रमक, बॅरिकेड तोडून प्रशासकीय इमारतीकडे घेतली धाव; परब, सरदेसाईंची CM सोबत बैठक

Mopa Airport Parking Fee Issue: टॅक्सीचालकांची बाजू मांडण्यासाठी आमदार विजय सरदेसाई, रिव्होल्युशनरी गोवन्सचे प्रमुख मनोज परब यांनी महालक्ष्मी निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पेडणे: मोपा विमानतळाच्या टॅक्सी पार्किंगसाठी 'जीएमआर' कंपनीने शुल्क वाढ लागू केल्याच्या विरोधात टॅक्सी व्यावसायिकांनी सोमवारी (२९ सप्टेंबर) फाटकाबाहेरील पोलिसांना न जुमानता बॅरिकेड तोडून प्रशासकीय इमारतीकडे धाव घेतली. यावेळी अधिकाऱ्यांशी चर्चा निष्फळ झाल्याने आंदोलकांनी तिथेच ठिय्या मारला.

आंदोलक टॅक्सी व्यावसायिकांचे नेतृत्व आमदार विजय सरदेसाई, मनोज परब, दुर्गादास कामत, दीपक कळंगुटकर, शिव वॉरियर्स युनायटेड टॅक्सी युनायटेड संघटनेचे अध्यक्ष रामा वारंग, संघटनेचे खजिनदार निखिल महाले, चेतन कामत, अनिकेत साळगावकर यांनी केले यांनी केले. शुल्कवाढ मागे घेईपर्यंत ऑफिसच्या दारात ठिय्या आंदोलन सुरूच राहील, असे आंदोलकांनी सांगितले.

सरदेसाई, परब यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

जीएमआर कंपनीने मोपा विमानतळावरील पार्किंग शुल्कवाढ केल्याने त्याविरोधात टॅक्सीचालकांनी आंदोलन छेडले आहे. टॅक्सीचालकांची बाजू मांडण्यासाठी गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई, रिव्होल्युशनरी गोवन्सचे प्रमुख मनोज परब यांनी महालक्ष्मी निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

यावेळी सरदेसाई यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, जीएमआर, टॅक्सी चालक आणि सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एक करार झाला होता. जीएमआरने केलेल्या कराराकडे दुर्लक्ष केल्याने हा मुख्यमंत्र्यांचा अपमान असल्याचा आरोप त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे गोव्याचा अपमान, मोपावरील विषय आपण प्रथमच घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आलो आहोत. मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी सरदेसाई व इतरांचे शिष्टमंडळ निवासस्थानात गेले असून, बैठकीत काय चर्चा झाली, त्याचे उत्तर बाहेर आल्यानंतर सरदेसाई देतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगला मोठा झटका! कॅनडाने 'दहशतवादी संघटना' म्हणून केले घोषित, संपत्ती जप्त करण्याचा मार्ग मोकळा

Cricketer Retierment: क्रीडाविश्वात खळबळ! दोन वर्ल्डकप जिंकणाऱ्या 'या' दिग्गजाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट

Goa Cricket Betting: भारत-पाक फायनल सामन्यावर सट्टा, सांकवाळमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 10 लाखांच्या मुद्देमालासह 5 जण ताब्यात

'सरकार दारात नोकरी घेऊन येणार नाही, घरातून बाहेर पडा मुलाखती द्या'; CM सावंतांचे गोमंतकीय तरुणांना आवाहन

Viral Video: सरकत्या जिन्यावर 'बकऱ्यांची सवारी', महिलेचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, ''रीलचं भूत लोकांना जोकर बनवतंय''

SCROLL FOR NEXT