Viral Video: सरकत्या जिन्यावर 'बकऱ्यांची सवारी', महिलेचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, ''रीलचं भूत लोकांना जोकर बनवतंय''

Social Media Viral Video: आजच्या सोशल मीडियाच्या जगात मनोरंजक, विचित्र आणि अनेकदा चकित करणारे व्हिडीओ तूफान व्हायरल होतात.
Social Media Viral Video
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Social Media Viral Video: आजच्या सोशल मीडियाच्या जगात मनोरंजक, विचित्र आणि अनेकदा चकित करणारे व्हिडीओ तूफान व्हायरल होतात. सोशल मीडियावर दररोज लाखो लोक फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करतात. यापैकी 'जुगाड', 'स्टंट' किंवा 'ड्रामा'चे व्हिडिओ लगेच व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर धूमाकूळ घालत आहे, ज्यात एका महिलेने केलेला एक अनोखा प्रकार पाहून नेटिझन्सही हैराण झाले.

आधी हा व्हिडिओ पाहा!

Social Media Viral Video
Margao: 'पैसे देतो, लस्सी देतो पाकिस्तानचे समर्थन कर'! मडगावातील अल्पवयीनाचा Video Viral; संतप्त नागरिकांचा पोलिस ठाण्यावर मोर्चा 

सरकत्या जिन्यावर बकऱ्यांची सवारी

दरम्यान, सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला (Women) सार्वजनिक ठिकाणी असलेल्या सरकत्या जिन्यावर (Escalator) चढताना दिसत आहे. मात्र, ती एकटी नाही. तिने आपल्यासोबत दोन बकऱ्यांसुद्धा आणल्या आहेत. ही महिला मोठ्या आत्मविश्वासाने आणि सहजपणे एका हातात दोन्ही बकऱ्यांची दोरी पकडून जिन्यावर उभी आहे.

हा व्हिडिओ नेमका कोणत्या शहरातील आहे, किंवा हे रेल्वे स्टेशन, मेट्रो स्टेशन की मॉल आहे, याची नेमकी माहिती उपलब्ध नाही. पण महिलेचा हा विचित्र व्हिडिओ पाहून लोक अचंबित झाले आहेत. व्हिडिओमध्ये वरच्या बाजूला 'बिहार से दिल्ली का सफर' असे लिहिलेले आहे, पण हा व्हिडिओ खरच दिल्लीचा आहे की नाही, हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, बकऱ्यांसोबत जिन्याचा वापर करण्याची ही अनोखी कल्पना अनेकांना खूपच मजेशीर वाटत आहे.

Social Media Viral Video
Viral Video: लव्ह, फन आणि ताकद! नवऱ्यांना उचलून बायकांनी लावली आगळीवेगळी शर्यत, व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

'बकरी जास्त गरजेची' म्हणत व्हिडिओ पोस्ट

सोशल मीडियावर (Social Media) तूफान व्हायरल झालेला हा व्हिडिओ 'X' वर @ArshadK96995026 नावाच्या अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. बातमी लिहेपर्यंत हा व्हिडिओ 63 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'बकरी ज्यादा जरुरी है'. दुसरीकडे, या व्हिडिओवर सोशल मीडिया यूजर्संनीही तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या घटनेवर आश्चर्य व्यक्त केले, तर काहींनी हा केवळ 'रीलसाठीच सुरु असल्याचे म्हटले.

Social Media Viral Video
India vs Pakistan: "अरे पाकिस्तान कुछ तो करके दिखा... थू", पाकड्यांची चिमुकल्याने काढली लाज; Viral Video पाहा

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

  • एका यूजरने लिहिले, "या बकऱ्या येथे कशाला घेऊन आली आहे?"

  • दुसऱ्या एका यूजरने कमेंट केली, "या तर गावच्या सिस्टर आहेत."

  • तिसऱ्या यूजरने म्हटले, "हे सगळं रीलसाठी सुरु आहे."

  • चौथ्या यूजरने टीका करत लिहिले, "रीलचं भूत लोकांना जोकर बनवत आहे."

एकंदरीत, या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर एक मनोरंजक चर्चा सुरु झाली असून सामग्रीचा शोध घेणारे लोक अशा विचित्र व्हिडिओंचा आधार घेत व्ह्यू आणि लाईक्स मिळवताना दिसत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com