Goa Monsoon 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Update 2023: सावधान... राज्यात अतिवृष्टीचा इशारा

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Monsoon Update अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून राज्यात पुढील दोन आठवडे अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. राज्यात पुढील आठवडाभर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री मुसळधार पावसाने राज्याला झोडपले.

उशिरा दाखल झालेल्या मॉन्सूनने गेला आठवडाभर जोरदार बॅटिंग केली असून राज्यभर जनजीवन प्रभावित झाले आहे.

अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या असून काही ठिकाणी रस्ता खचणे, घरांच्या भिंती पडणे, अशा दुर्घटनांनाही सामोरे जावे लागत आहे. सखल भागात पाणी साचल्याने लोकांना त्रास सहन करावा लागत आहे, तर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतुकीचा वेग मंदावल्याचे दिसून येते.

दिलासादायक बाब म्हणजे, पाऊस दोन आठवडे संततधार बरसल्यास राज्यातील पाण्याचा तुटवडा कमी होऊन कोरडी पडलेली धरणेही भरू लागतील.

मागील २४ तासांत राज्यात एकूण ८९.३ मिमी म्हणजेच ३.५१ इंच पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत राज्यात ६५५ मिमी म्हणजेच २५ इंचांहून अधिक पाऊस पडला आहे.

जरी राज्यात मोठ्या प्रमाणात पावसाला सुरवात झाली असली तरी अजूनही २८ टक्के पावसाचा तुटवडा आहे.

केंद्र सरकारकडून १५ राज्यांकरिता ४९८४ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. यात गोव्यासह आंध्रप्रदेश, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, तमिळनाडू, पंजाब यांचा समावेश आहे.

केंद्र सरकारकडून मॉन्सूनच्या पार्श्‍वभूमीवर हा निधी उपलब्ध करून दिल्याने आपत्ती निवारणासाठीच्या उपाययोजना करण्यास मदत होणार आहे.

वीज खांब भुईसपाट:-

1. राजधानी पणजीत शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसासह जोराचा वारा सुटल्याने अनेक ठिकाणी पडझड झाली.

सांतिनेज येथील आप्टेश्‍वर मंदिराजवळ नारळाचे झाड वीज खांबावर कोसळल्याने या भागातील वाहतूक ठप्प झाली. सुदैवाने वीजपुरवठा खंडित झाल्याने दुर्घटना टळली.

2. आल्तिनोवर वीज केंद्राजवळच एक झाड पडल्यामुळे तेथेही वाहतूक कोंडी झाली. हे झाड बाजूच्या वीजतारा आणि दूरचित्रवाणी केबलवर पडल्याने लोकांची तारांबळ उडाली. माशेल येथे झाड पडून दुर्घटना घडल्याची माहिती मिळाली.

15 वर्षांतील पहिलीच वेळ : राज्यात 23 जूनपासून मुसळधार पाऊस पडत असला, तरी अद्याप 28.3 टक्के पावसाची तूट नोंदवली गेली आहे. सरासरी 914 मिमी. पाऊस अपेक्षित असताना केवळ 655 मिमी. पाऊस पडला आहे. जून महिन्यात इतका कमी पाऊस पडण्याची अलीकडच्या 15 वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

शाळकरी मुलांच्या बाबतीत आपण किती जागरूक, शिक्षित आणि गंभीर आहोत?

SCROLL FOR NEXT