Goa Monsoon Update: गणेशभक्त विसर्जन करतांना Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Updates: पाऊस ओसरल्याने गणेशभक्तांत उत्साह

पाचव्या दिवशी पाऊस ओसरल्याने विसर्जनासाठी बाहेर पडलेल्या गणेशभक्तांना दिलासा

दैनिक गोमन्तक

पणजी: सकाळच्या प्रहरात काही ठिकाणी पावसाने (Goa Monsoon Updates) हजेरी लावली होती. त्यानंतर मात्र पावसाने उसंत दिल्याने भक्त घराबाहेर पडले. गणपती बाप्पांचे (Ganapti) आगमन झाल्यापासून राज्यात सलग चार दिवस पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे गणेशभक्तांत उदासीनता होती. पाचव्या दिवशी विसर्जनासाठी बाहेर पडलेल्या गणेशभक्तांना दिलासा मिळाला.

राज्यात काल मंगळवारी केवळ एक इंच पावसाची नोंद झाली. तरीही सरासरी वाढत आहे. कालपर्यंत राज्यात सरासरीत पाच टक्क्यांची वाढ झाली होती. ती सहा टक्क्यांवर पोहचली आहे. आज बुधवारपासून राज्यासह कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर ओसरेल. क्वचितच एखाद्या ठिकाणी पावसाच्या सरी कोसळतील, असे हवामान वेधशाळेने म्हटले आहे.

पेडणेत जोरात

राज्यात पावसाचा जोर ओसरत असताना पेडणे परिसराला मात्र पावसाने अक्षरशः झोडपून काढले. पेडणे पर्जन्यमापन केंद्रावर तब्बल 3.6 इंच पावसाची नोंद झाली. सांगे आणि वाळपई या पर्जन्‍यप्रवण भागात पावसाचा जोर होता. वाळपईत 1.5 तर सांंगेत 2.5 इंच पाऊस झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT